Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी फर्जंद पासूनच सुरु झाली होती – मृण्मयी देशपांडे

 फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी फर्जंद पासूनच सुरु झाली होती – मृण्मयी देशपांडे
आठवणींच्या पानावर मिक्स मसाला

फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी फर्जंद पासूनच सुरु झाली होती – मृण्मयी देशपांडे

by Kalakruti Bureau 09/08/2020

महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही अष्टपैलू आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. तिच्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१९ मध्ये फत्तेशिकस्त या चित्रपटात ती केसर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली, शिवकालीन भाषा आणि तलवार बाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं. फत्तेशिकस्त मधली ही केसर आता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १६ ऑगस्टला या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर होणार आहे आणि त्या निमित्ताने मृण्मयीसोबत साधलेला हा खास संवाद

१. या ऐतीहासीक चित्रपटातील भूमिकेसाठी जेव्हा तुम्हाला विचारण्यात आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती?

  • फर्जंद नंतर लगेचच दिग्पालने फत्तेशिकस्तची जुळवा जुळव सुरु केली. मला माहित होतं की केसरची भूमिका मला परत करायला मिळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. त्याने मला सांगितलं होतं कि फत्तेशिकस्त मधील केसर थोडी वेगळी असणार आहे.आणि त्या मुळे उत्सुकता अजुनच वाढली होती.

२. तुमच्या चित्रपटातील भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केली?

  • फत्तेशिकस्त मधील केसर आणखी नवखी होती. तिने एखादी चूक जर केली तर त्याची किंमत तिला एकटीलाच नाही तर सर्वानाच भोगावी लोणार होती. अशा परिस्थितीमध्ये बहिर्जी नाईकांनी तिला सहभागी करून घेतल होतं. फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी तशी फर्जंद पासूनच सुरु झाली होती. मी संहिता वाचल्यावर त्या भूमिकेची गाभा मला कळाला.

३. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एखादा अविस्मरणीय किस्सा सांगा

  • या चित्रपटातील एक सीनच माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. जेव्हा केसर पकडली जाईल कि काय अशी भीती निर्माण होते आणि भटारखान्यात नामदारखान जेव्हा केसरचा गळा धरतो तेव्हा मला वेग वेगळे हावभाव एकाच वेळेस दयायचे होते. हा अवघड सीन आम्ही शूट केला आणि तो पहिल्याच टेक मध्ये व्यवस्थित शूट झाला. दिग्पाल आणि माझा अत्यंत आवडीचा हा प्रसंग होता.

४. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळालेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट .?

  • बहिर्जी नाईक आणि केसर यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या असं बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं. आणि मी आधी सांगितलेला सीन त्याचं कौतुक खूप लोकांनी केलं.

५. या चित्रपटाने बॉक्सऑफिस तर गाजवलंच पण आता पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षक घरबसल्या झी टॉकीजवर पाहू शकतील, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल ?

  • झी टॉकीज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली वाहिनी आहे. झी टॉकीज वरील चित्रपट प्रेक्षकांनी नेहमीच दर्जेदार चित्रपट म्हणून स्वीकारलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना झी टॉकीज च्या मार्फत फत्तेशिकस्त बघायला मिळणं ही एक पर्वणीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांचा पराक्रम प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ही संधी कोणीच सोडू नये अशी विनंती मी सगळ्यांना करते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: kesar mrunmayee
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.