Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Mrunmayee Deshpande: ६ अभिनेत्यांसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार!
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त आणि दर्जेदार चित्रपटांची चलती आहे. अशातच गणराज स्टुडिओ आणि ‘संजय दावरा’ एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका खास दरवाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे मृण्मयी देशपांडे या चित्रपटात पहिल्यांदाच ६ अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
=============================
हे देखील वाचा: Ambat Shoukin Marathi Movie: विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
=============================
‘मना’चे श्लोक‘ चित्रपटाच्या व्हिडिओत दोन दरवाजे असून एकाचा रंग निळा तर दुसऱ्याचा लाल असून या दृश्यातून चित्रपट मानवी मनाच्या खोल, गुंतागुंतीच्या भावनांचा शोध घेतो, हे स्पष्ट होते. चित्रपटात मृण्मयी सोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन,हरीश दुधाडे आणि करण परब हे सहा अभिनेते या चित्रपटात झळकणार आहेत.(Manache Shlok Marathi Movie)

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने केले असून यापूर्वी तिने ‘मन फकीरा’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. चित्रपटाबद्दल मृण्मयी देशपांडे म्हणते, “दिग्दर्शक, लेखिका म्हणून हा माझा दुसरा चित्रपट आहे. ही माझ्या मनातलीच गोष्ट आहे, जी मी चित्रपटाच्या माध्यमातून साकारली आहे. यात माझ्यासोबत सहा गुणी अभिनेते आहेत. ज्यांच्यामुळे एक छान टीम जुळून आली आहे. एकंदरीत सगळेच खूप छान जमून आले आहे. म्हणूनच या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे.”(Manache Shlok Marathi Movie)
