Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक एपिसोड ची कमाई ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !
Mukesh Khanna: भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील एक अढळ नावलौकिक असलेले नाव म्हणजे मुकेश खन्ना. ९० च्या दशकातील प्रत्येक घरात, प्रत्येक लहानग्याच्या मनात स्थान निर्माण करणारा ‘शक्तिमान’ हा फक्त एक टीव्ही कॅरेक्टर नव्हता, तो एक प्रेरणा होता. पण या यशामागे एक संघर्षमय आणि धैर्यपूर्ण कहाणी लपलेली आहे, जी अनेकांसाठी आदर्श ठरू शकते. मुकेश खन्ना यांना सुरुवातीला अभिनयात रस नव्हता. ते प्लास्टिक इंजिनियर होण्याची तयारी करत होते आणि त्यासाठी त्यांनी सेंट जेविअर्स स्कूलमधून बीएससी पूर्ण केली होती. त्यानंतर, भावाने सल्ला दिल्यामुळे त्यांनी एलएलबीला प्रवेश घेतला आणि कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. हळूहळू अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी पुण्यातील ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये प्रवेश घेतला. (Shaktimaan Serial Per Day Pay)

पुण्यातून शिक्षण घेतल्यानंतर १९७८ मध्ये त्यांना ‘खूनी’ नावाच्या चित्रपटात पहिल्यांदा काम मिळाले, पण तो प्रदर्शितच झाला नाही. यानंतर ‘रुही’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला, जो त्यांच्या करीयरचा अधिकृत डेब्यू ठरला. विशेष म्हणजे हा चित्रपट त्यांच्या १५व्या साइन केलेल्या चित्रपटांपैकी एक होता, पण प्रदर्शित मात्र सगळ्यांत आधी झाला.1997 साली दूरदर्शनवर प्रदर्शित झालेला ‘शक्तिमान’ हा भारताचा पहिला सुपरहीरो शो होता, जो 2005 पर्यंत चालला. या शोचे निर्माता, लेखक आणि मुख्य कलाकार स्वतः मुकेश खन्ना होते. ‘शक्तिमान’साठी त्यांनी मोठं आर्थिक धाडस केलं. सुरुवातीला त्यांनी आपल्या मित्राकडून ८ लाख रुपये उधार घेतले, पण पार्टनरशिपच्या अटी न पटल्याने हे आर्थिक सहकार्य थांबवले. नंतर अंबू मुरारका यांनी त्यांना ७५ लाख रुपये कोणताही व्याज न घेता दिले आणि मुकेश खन्ना यांनी ही रक्कम दोन वर्षांत परतही केली. शोच्या निर्मितीसाठी त्यांनी टीमच्या सदस्यांकडून सुद्धा पैसे उधार घेतले होते.

एका एपिसोडची शूटिंग पूर्ण करायला ४ ते ५ दिवस लागत. सुरुवातीला त्यांना एका एपिसोडसाठी ७.८० लाख रुपये मिळत असत. जेव्हा शोने १०० हून अधिक भाग पार केले, तेव्हा त्यांचा मानधन वाढवून १० लाखांपर्यंत गेले. शक्तिमानसारख्या शोने त्यांना घराघरात पोहोचवलं, पण ‘महाभारत’मधील भीष्म पितामहाच्या भूमिकेने त्यांना अजरामर केलं. हे पात्र आजही लोकांच्या मनात आहे. गंभीर, नैतिक आणि मूल्यप्रधान व्यक्तिमत्वाचं उत्तम उदाहरण त्यांनी या भूमिकेद्वारे सादर केलं. (Shaktimaan Serial Per Day Pay)
===================================
===================================
सुमारे ५० वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत मुकेश खन्ना यांनी केवळ अभिनयच नाही, तर आपल्या मूल्यांवर ठाम राहून एक प्रेरणादायक प्रवास घडवला. आजही ते आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. टीव्हीपासून ते सिनेसृष्टीपर्यंत, त्यांनी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रामाणिकपणा ठेवला आणि त्यांचा प्रवास नवोदित कलाकारांसाठी एक मार्गदर्शक ठरतो. उत्स्फूर्त अभिनय, धाडसी निर्णय आणि अपार मेहनत यांच्या जोरावर मुकेश खन्ना यांनी भारतीय टेलिव्हिजनमध्ये अजरामर स्थान निर्माण केलं. त्यांची ही कहाणी म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्रोत आहे.