Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mukkam Post Devach Ghar Movie Trailer: उत्तम कथानकाला रंजकतेची जोड असलेल्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

 Mukkam Post Devach Ghar Movie Trailer: उत्तम कथानकाला रंजकतेची जोड असलेल्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
Mukkam Post Devach Ghar Movie Trailer
मिक्स मसाला

Mukkam Post Devach Ghar Movie Trailer: उत्तम कथानकाला रंजकतेची जोड असलेल्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

by Team KalakrutiMedia 20/01/2025

Mukkam Post Devach Ghar Movie Trailer: आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.(Mukkam Post Devach Ghar Movie Trailer)

Mukkam Post Devach Ghar Movie Trailer
Mukkam Post Devach Ghar Movie Trailer

लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून “सुंदर परिवानी” ह्या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

==================================

हे देखील वाचा: Siddharth Chandekar आणि Mitali Mayekar पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार…

==================================

एखादी चांगली कलाकृती तुम्ही केल्यावर नक्कीच त्यामागे अनेकजण पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्याचप्रमाणेच मंगेश ही या कलाकृतीच्या मागे प्रस्तुतकर्ता म्हणून उभा राहिला.चित्रपटाचा ट्रेलर मला खुप आवडला. दिग्दर्शक संकेतने या चित्रपटाची मांडणी उत्तम केली असल्याचे ट्रेलर मधून दिसून येते आहे. मायराने या चित्रपटात साकारलेली प्रमुख भूमिका उल्लेखनीय असल्याचे ट्रेलर मधून जाणवते आहे. तिने यात सातत्य ठेऊन अनेक उत्तम भूमिका साकारुन मनोरंजन विश्वात अजुन नाव कामवावे यासाठी माझे तिला अनेक आशीर्वाद असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.

Mukkam Post Devach Ghar Movie Trailer
Mukkam Post Devach Ghar Movie Trailer

मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.

===============================

हे देखील वाचा: Veena Jamkar आणि Vanita Kharat झाल्या सख्ख्या शेजारी!

==============================

चित्रपटाचे छायाचित्रण रोहन मडकईकर यांनी केले असून गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीताना चिनार महेश यांचे श्रवणीय संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर याचे असून कार्यकारी निर्माता म्हणून अतुल साळवे यांनी काम पाहिले आहे.तर असा हा सहकुटुंब पाहता येणारा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पाहावा लागेल यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Movie mayra waykool Mukkam Post Devach Ghar Movie Trailer pooja sawant sachin pilgaonkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.