Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mukta Barve : नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!

 Mukta Barve : नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!
मिक्स मसाला

Mukta Barve : नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!

by रसिका शिंदे-पॉल 27/01/2026

मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असणारा माया चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या आदित्य इंगळे यांच्या माया या नव्या चित्रपटात एक वेगळं भावविश्व आपल्यासमोर येणार आहे. चित्रपटांची खास ओळख आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचा टीझर कसा आहे.

टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. ‘माया’चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचं जाणवतं.

चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचं प्रभावी प्रतिनिधित्व करतात. तर गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेते. आजाराने ग्रस्त असलेला, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसतो. त्यांचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.

================================

हे देखील वाचा : ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ चित्रपटातून ‘नक्षत्रांचे देणे’ या अजरामर गीताचं नवं रूप प्रेक्षकांसमोर

================================

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही हळवी तरीही खोलवर जाणारी कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Girish oak marathi movie 2026 maya movie mukta barve Rohini Hattangadi siddharth chandekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.