हेमांचं जितेंद्रंशी जुळलेलं लग्न Dharmendra यांनी कसं मोडलं? जाणून घेऊयात

“जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच तो सीन…”, Mukta Barve हिने सांगितला ‘जोगवा’चा अनुभव
अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिचा ‘असंभव’ (Asambhav Marathi Movie)) चित्रपट नुकताच रिलीज झाला… पुर्नजन्मावर आधारित या थ्रिलर चित्रपटात खरं तर दुहेरी भूमिकेत दिसलेली मुक्ता प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणेच सादर करते… राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘जोगवा’ चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता.. देवीचे उपासक असणाऱ्या जोगतीणी आणि जोगता यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती… समाजाच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या या समाजाचं सत्य खरं तर यातून मांडण्यात आलं होतं.. नुकत्याच एका मुलाखतीत मुक्ताने जोगवा चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला.. यावेळी चित्रपटाच्या शुटींगचा एक खास किस्सा तिने सांगितला… (Jogwa Movie)

आरपारला दिलेल्या मुलाखतीत मुक्ता म्हणाली की, “खरं तर जिथे सौंदत्तीची लग्न लागतात तिकडेच आमच्या लग्नाचा सीन शूट केला गेला. आणि तिकडे आमच्या आसपास खरी लग्न सुरू होती. एका पॉइंटला मी राजीवकडे गेले आणि त्याला रिक्वेस्ट केली की आपण हा सीक्वेन्स लवकर संपूया का…कारण मला असह्य होतंय इकडे थांबणं. तिकडे कोणाचं तरी खरंच लग्न लागत होतं. मी तर अभिनय करत होते. ते उद्यापासून जोगते जोगतीण असणार होते आणि त्यांचं आयुष्य आता त्यांच्या हातात राहणार नव्हतं. त्या रुढी आणि परंपरांविषयी मला वाईट बोलायचं नाहीये. पण, त्या अंधश्रद्धेमुळे काही लोकांची आयुष्य ही कायमची कोमेजली”…. (Marathi Entertainment News)

पुढे मुक्ता म्हणाली की, “एक जोगता होता आमच्यासोबत… त्याला यातून बाहेर पडायचं होतं. साडी नेसलेला होता तो मध्येमध्ये लेंगा घालायचा… पण तो म्हणाला आता मी बाहेर नाही पडू शकत… माझं अर्ध्याहून जास्त आयुष्य गेलं. मला तेच वाटतं की आता मी कदाचित तितकी बरी दिसणार नाही. जितकी मी तेव्हा दिसले होते. वयामुळे नाही पण समजतीमुळेच गडबड होईल. तुमच्या एका निरागस आयुष्याची वाट लागतानाची गोष्ट निरागस डोळ्यातूनच बाहेर येऊ शकते”… (Bollywood)
================================
हे देखील वाचा : Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….
================================
दरम्यान, ‘जोगवा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केलं होतं… ५७व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘जोगवा’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सामाजिक विषय हाताळणारा चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृ्ष्ट पार्श्वगायिका इतके पुरस्कार नावावर केले होते… या चित्रपटात मुक्ता बर्वे, उपेंद्र लिमये, प्रिया बेर्डे, विनय आपटे, चिन्मय मांडलेकर, किशोर कदम, अनिता दाते, अदिती देशपांडे, स्मिता तांबे यांच्यासह अनेक कलाकार झळकले होते… (Jogwa Movie cast))
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi