‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन झालं तरी किती?
अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा हाऊसफुल्ल ५ सध्या सुपरहिट सुरु आहे… हाऊसफुल्ल या फ्रेचायझीमधील हा पाचवा भाग असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हाऊसफुल्ल ५ मध्ये प्रेक्षकांना केवळ विनोदच नाही तर मर्डर मिस्ट्री देखील पाहायला मिळणार असून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एकाच चित्रपटाचे २ क्लायमॅक्स दाखवण्यात आले. हाऊसफुल्ल ५ A आणि हाऊसफुल्ल ५ B या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊयात एकूण कमाई…(Housefull 5 movie)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, हाऊसफुल्ल ५ चित्रपटाने पहिल्या दिवशी २४ कोटी, दुसऱ्या दिवशी ३१ कोटी, तिसऱ्या दिवशी ३२.५ कोटी, चौथ्या दिवशी १३ कोटी, पाचव्या दिवशी ११.२५ कोटी, सहाव्या दिवशी ८.५ कोटी, सातव्या दिवशी ७ कोटी कमवून पहिल्या आठवड्यात १२७.२५ कोटी कमावले होते. आठव्या दिवशी ८ कोटी, नवव्या दिवशी ९.५ कोटी, दहाव्या ११.५ कोटी, अकराव्या ३.७५ कोटी, बाराव्या दिवशी ४.२५ कोटी, तेराव्या ३ कोटी, चौदाव्या दिवशी २.८५ कोटी कमवत दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ४०.८५ कोटी आणि पंधराव्या दिवशी ०.३२ लाख कमवत आत्तापर्यंत चित्रपटाने १६८.४२ कोटींची कमाई केली आहे. (Housefull 5 box office collection)
================================
हे देखील वाचा: Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती
=================================
दरम्यान, ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात १८ दिग्गज कलाकार असून बजेट २२५ कोटी होतं. पण पंधरा दिवसात भलीमोठी स्टारकास्ट असूनही चित्रपट बजेट रिकव्हर करु शकला नाही..आता आमिर खानच्या सितारे जमीन वर चित्रपटामुळेही हाऊसफुल्ल ५ च्या कमाईवर परिणाम होईल असं सांगितलं जात आहे…(Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi