‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

“MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्यावर झळकणार; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांची जोडी दिसणार !
मुंबई शहराची लाइफलाइन, तिची अस्सल ओळख म्हणजे मुंबई लोकल. ही केवळ ट्रेन नाही, ती इथल्या लाखो लोकांची जीवनवाहिनी आहे. याच लोकलच्या गोंगाटात, दाट गर्दीत आणि धावपळीच्या धकाधकीत एक हळुवार प्रेमकहाणी आकार घेताना प्रेक्षकांना “मुंबई लोकल” या नव्या मराठी चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. मुंबई शहराचं हृदय समजली जाणारी मुंबई लोकल आणि तिच्या प्रवासात फुलणारी एक हळवी प्रेमकहाणी हे सगळं आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या “मुंबई लोकल” या आगामी मराठी चित्रपटातून, प्रेक्षकांना एक वेगळी, तरल आणि जिवंत कथा अनुभवता येणार आहे. (MUMBAI LOCAL Marathi Movie)

या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब (Prathemsh Parab) आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयासोबतच या चित्रपटात मनमीत पेम, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, स्मिता डोंगरे यांसारखे ताकदीचे कलाकार आपली छाप पाडणार आहेत.
=========================
=========================
‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि अभिजित दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निलेश राठी, प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी केली असून, त्र्यंबक डागा सहनिर्माते आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे, संकलन स्वप्नील जाधव यांचे, तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. गीत-संगीत देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी दिलं असून, गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजित यांच्या लेखणीतून गाणी सजली आहेत.

मुंबई लोकल या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही एक अशी प्रेमकहाणी आहे जी गर्दीतुन फुलत जाणार आहे. लोकलमध्ये रोज घडणाऱ्या लहानसहान गोष्टी, ओळखी, नाती, आणि त्या नात्यांतून उलगडत जाणाऱ्या भावना हे सारं या चित्रपटात सुरेख रेखाटण्यात आलं आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या लोकलमध्ये फुललेलं प्रेम, अशा प्रकारे मराठीत पहिल्यांदाच साकारणार असल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
=========================
=========================
‘टाइमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’ सारख्या गाजलेल्या चित्रपटातून खळखळून हसवणारा प्रथमेश परब आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या सिनेमात एक वेगळीच जादू निर्माण करणार, यात शंका नाही. “मुंबई लोकल” हा फक्त एक सिनेमा नाही, तर तो आहे एका शहराच्या आणि त्याच्या माणसांच्या अस्सल धकधकीचा, भावनांचा आणि नात्यांचा प्रवास. १ ऑगस्टपासून हा अनुभव मोठ्या पडद्यावर घ्यायलाच हवा असाच असेल यात शंका नाही.