Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Munnabhai MBBS मधला ‘तो’ सीन ‘3 Idiots’ मध्ये कसा आला?

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar;

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sanjay Dutt याच्या चित्रपटाचे साऊथमध्ये ४ रिमेक्स; शाहरुख खाननेही नाकारलेला ‘हा’ चित्रपट

 Sanjay Dutt याच्या चित्रपटाचे साऊथमध्ये ४ रिमेक्स; शाहरुख खाननेही नाकारलेला ‘हा’ चित्रपट
मिक्स मसाला

Sanjay Dutt याच्या चित्रपटाचे साऊथमध्ये ४ रिमेक्स; शाहरुख खाननेही नाकारलेला ‘हा’ चित्रपट

by रसिका शिंदे-पॉल 30/05/2025

‘जादू की झप्पी चाहीये क्या?’ दिवसभरात कामाच्या व्यापातून थकल्यानंतर हे वाक्य कुणी तरी म्हणावं असं नक्कीच वाटतं… काही चित्रपट खरं तर केवळ पलं मनोरंजन नाही तर जगण्याचा मंत्रा किंवा कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा आठवणी देऊन जातात… २००३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या (Sanjay Dutt) या एका चित्रपटाने त्याचं करिअर तर पालटलंच पण हिंदी चित्रपटसृष्टीत कॉमेडी चित्रपटातून एक मेसेज देण्याचा ट्रेण्डही सेट केला होता… इतकंच नाही तर संजय दत्तच्या या चित्रपटाने चक्क साऊथमध्ये ४ रिमेक करण्यात आले होते आणि शाहरुख खानसह (Shah Rukh Khan) बड्या कलाकारांनी रिजेक्ट केलेली ही स्क्रिप्ट संजय दत्तच्या यशाची किल्ली बनली होती….(Bollywood movies remakes)

तर, २००३ मध्ये राजकूमार हिरानी यांचं पहिलंच दिग्दर्शन असणारा ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ (Munnabhai MBBS) हा चित्रपट रिलीज झाला. सुनील दत्त (Sunil Dutt) यांचा मुलगा संजय असूनही त्याच्याआधी हा चित्रपट शाहरुख खान, अनिल कपूर, विवेक ऑबरॉय यांना ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी चित्रपट नाकारल्यानंतर शेवटी संजय दत्तकडे हा चित्रपट आला आणि त्याने या संधीचं सोनं करुन दाखवलं. ‘मुन्नाभाई’ चित्रपट करण्यापूर्वी संजयच्या वैयक्तिक जीवनात आलेलं वादळ या चित्रपटामुळे नक्कीच शांत झालं असं म्हटलं जातं.(Entertainment tadaka)

‘मुन्नाभाई एम.बीबी.एस’ चित्रपटाने प्रेक्षकांचं तर मन जिंकलं होतंच पण १० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने २००३ मध्ये ३२.१२ कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. हिंदीत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यामुळे साऊथमध्ये या चित्रपटाचे रिमेक करण्यात आले आणि ते चारही चित्रपट हिट ठरले.(Entertainment news)

‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ (Munnabhai MBBS) चित्रपटाचे ४ दाक्षिणात्य भाषेत रिमेक्स करण्यात आले. Vasoolraja MBBS (तमिळ-२००४), Shankar Dada MBBS (तेलुगु -२००४) या नावाने रिलीज झाला होता आणि महत्वाचं म्हणजे यात चिरंजीवी आणि सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. तर, Uppi Dada MBBS (कन्नड- २००७) आणि दक्षिण आशियातील श्रीलंका या देशाची राष्ट्रभाषा असणाऱ्या सिंहला (Sinhala) या भाषेत हा चित्रपट Dr या नावाने रिलीज झाला होता. बरं, हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘पॅच एडम्स’ नं प्रेरित असल्याचं म्हटलं. त्यात रॉबिन विलियम्सनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. (South Indian film)

================================

हे देखील वाचा: ‘कजरा रे’ गाण्याबद्दल Amitabh Bachchan यांना होती शंका, शुट करायला दिलेला नकार

=================================

दरम्यान, संजय दत्तच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ हा एक चित्रपट होता. ज्यात संजय दत्तसह सुनील दत्त, रोहिणी हट्टंगडी, ग्रेसी सिंह, अर्शद वारसी असे अनेक कलाकार दिसले होते. या चित्रपटाने केवळ समीक्षक किंवा प्रेक्षकांचं मनच जिंकलं नाही तर २००४ मधील लोकप्रिय पॉप्युलर चित्रपट नॅशनल अवॉर्ड्सचा देखील पुरस्कार पटकावला होता.(Bollywood cult classic movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood movies bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment industry munnabhai mbbs rajkumar hirani Rohini Hattangadi sanjay dutt shah Rukh Khan Sunil Dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.