Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ

Star Pravah च्या ‘मुरांबा’ मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप; रमा-अक्षयच्या आयुष्यात काय घडणार?
मराठी मालिका विश्वात सध्या फारच धुमाकूळ सुरु आहे… अशातच प्रेक्षकांच्या लाडक्या मुरांबा मालिकेबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे….स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. रमा-अक्षयची जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधितच महाराष्ट्रभरात लोकप्रिय झालं. आता या मालिकेत सात वर्षांचा लीप येणार असून या सात वर्षांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय एकमेकांपासून दुरावले. तर तिकडे इरावती आपल्या सुडबुद्धीने संपूर्ण मुकादम कुटुंबाला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय. या सगळ्यात अक्षयच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देणारी एकमेव घटना म्हणजे रमा आणि त्याची लाडकी लेक आरोही. आता आरोही रमा आणि अक्षयला एकत्र आणणार का हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.

दरम्यान, मुरांबा मालिकेत आरोहीच्या भूमिकेत बालकलाकार आरंभी उबाळे दिसणार आहे. मुरांबा मध्ये सुरु होणाऱ्या या नव्या अध्यायाविषयी सांगताना शशांक केतकर म्हणाला, “मालिकेने ११०० भागांचा टप्पा गाठलाय आणि हा प्रवास सुसाट सुरु आहे यासाठी स्टार प्रवाह वाहिनी, मालिकेची संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. जोवर वाहिनी, लेखक आणि दिग्दर्शकांना गोष्टीमध्ये पोटेंशिअल दिसतं तोवर ती गोष्ट रंगवत राहाणं हेच खरं कौशल्य असतं याचा मी एक भाग आहे याचा आनंद आहे. आपल्या आयुष्यात जसे वेगवेगळे टप्पे येत असतात त्याप्रमाणे मालिकेतही वेगवेगळी वळणं येतात. रमा-अक्षयचं एकत्र येणं, त्यांचं प्रेम, त्यांची भांडणं हे सारं आपण अनुभवलं. मुरांबा ही माझ्या आयुष्यातली जास्त भागांची मालिका आहे. याआधी इतक्या भागांची मालिका आणि इतक्या मोठ्या मुलीचे वडील मी कधीही साकारलेले नाही त्यामुळे वेगळा अनुभव आहे. खऱ्या आयुष्यात देखिल मी वडील असल्यामुळे सीन करताना देखिल माझ्यातला बाप डोकावत असतो”.
================================
=================================
दरम्यान, प्रेक्षकांना मुरांबा हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारी १.३० वाजता पाहता येईल. त्यामुळे रमा-अक्षयच्या नात्यात आला कोणतं वळण येणार आणि यात आरोहीची भूमिका नेमकी काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे…