Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

कथा कल्पना एकच, चित्रपट मात्र तीन, त्यात Sholay देखिल…

२०२५ मध्ये MAMI Mumbai Film Festival होणार नाही!

Akshay Kumar ७०० स्टंटमॅन्ससाठी ठरला देवमाणूस!

“स्मिता तळवलकर यांनी ‘त्या’ गोष्टीमुळे मला मालिकेतून काढून टाकल,पण नंतर…”

Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक

Saiyaara : बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ची जोरदार बॅटिंग ४ दिवसांत कमावले

ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित Amitabh-Jaya Bachchan यांचा हा सिनेमा अर्धवट का

Madhuri Dixit हिचा ‘तो’ चित्रपट ७३ वेळा पाहणारे कलाविश्वातील ‘ते’

Siddharth-Kiara : चिमुकल्या मल्होत्राचं घरी जंगी स्वागत; समोर आले फोटो…

Sonali Bendre : “मला वाटायचं मायकल जॅक्सनचं नाक…”

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक केतकरनं व्यक्त केली कृतज्ञता !

 Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक केतकरनं व्यक्त केली कृतज्ञता !
टीव्ही वाले मिक्स मसाला

Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक केतकरनं व्यक्त केली कृतज्ञता !

by Team KalakrutiMedia 21/07/2025

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार करत मोठं यश मिळवलं आहे. १४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झालेली ही मालिका आज घराघरात पोहोचली असून, रमा आणि अक्षय या जोडीसह संपूर्ण मुकादम कुटुंब प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेलं आहे. या मालिकेत अक्षय मुकादमची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर यासाठी हा एक विशेष टप्पा आहे. मराठी मालिकांमधील त्याच्या आजवरच्या प्रवासात ‘मुरांबा’ ही सर्वात जास्त भागांची मालिका ठरली आहे. या यशाबद्दल शशांकने सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये आपल्या भावना व्यक्त करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.(Muramba Serial)

Muramba Serial

“प्रत्येक नवीन प्रोजेक्ट सुरू करताना कलाकाराच्या मनात एक अनामिक धाकधूक असते. पण मुरांबा सुरू करताना ती फारशी जाणवली नाही, कारण स्टार प्रवाहसारखी मजबूत साथ, अनुभवी दिग्दर्शक, आणि सशक्त लेखन आमच्या पाठीशी होतं,” अशा भावना शशांकने व्यक्त केल्या आहेत. ‘मुरांबा’ केवळ मालिकाच नव्हे, तर एक कुटुंब बनलं’ असं तो पुढे म्हणतो. “मुकादम कुटुंबात अशा व्यक्तिरेखा होत्या, ज्या हसवतात, रडवतात, विचार करायला भाग पाडतात आणि नात्यांमधली गुंतागुंत सहजतेने सांगतात. प्रत्येक सदस्याने आपलं काम केवळ अभिनय म्हणून केलं नाही, तर त्या पात्रात शिरून ते जगलं. याचं फलित म्हणजे आज मिळालेलं प्रेक्षकांचं उदंड प्रेम.”

Muramba Serial

शशांक विशेषतः रमा-अक्षय या जोडीसाठी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे. “जिथे जिथे आम्ही गेलो, तिथे प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं. हेच आमचं खरं पारितोषिक आहे. पुरस्कारांपेक्षा ही भावना अधिक मौल्यवान आहे,” असं ही तो सांगतो. आज ११०० भाग पूर्ण झाल्यावरही पहिल्या दिवसाची तीच उत्सुकता, तोच उत्साह शशांकच्या बोलण्यातून जाणवतो. “आज जो आत्मविश्वास आहे, तो प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आहे. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं,” असं म्हणत त्याने प्रेक्षकांचे आणि स्टार प्रवाह वाहिनीचे मन:पूर्वक आभार मानले.(Muramba Serial)

==============================

हे देखील वाचा: Siddharth Jadhav चा पहिला गाजलेला ‘तो’ सिनेमा आता दिसणार छोट्या पडद्यावर !

==============================

आता ‘मुरांबा’ मालिकेच्या पुढच्या पर्वात काय घडणार, याची उत्कंठा वाढली आहे. रमा आणि अक्षयच्या आयुष्यात एक मोठा वळण येणार असून, त्यांच्या नात्याची नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही गोड-तोड मालिका पाहणं अजूनच रोचक होणार आहे.‘मुरांबा’, दररोज दुपारी १.३० वाजता, फक्त स्टार प्रवाहवर पाहता येईल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Janhavi Panshikar muramba marathi serial nishani borule Pratima Kulkarni Shashank Ketkar Shivani Mundhekar Star Pravah sulekha talwalkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.