मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
संगीतकार रोशनचे अखेरचे गाणे !
काही गाण्यांच्या मागे हळव्या आठवणी असतात.अशीच एक हळवी आठवण संगीतकार रोशन यांच्या एक गाण्याची. पन्नास आणि साठच्या दशकात अतिशय अप्रतिम संगीतप्रधान चित्रपट (बरसात की रात, ताजमहल,आरती,ममता,बावरे नैन,दिल हि तो है) देवूनही रोशन हे कायम दुसर्या फळीतील संगीतकार राहिले. १४ जुलै १९१७ रोजी जन्मलेले रोशनलाल नागरथ सुरूवातीला वादक म्हणून आकाशवाणीच्या कलकत्ता केंद्रावर नोकरी करत होते.तिथेच त्यांची भेट इरा मोइत्रा या गायिकेसोबत झाली. दोघेही स्ट्रगलर होते. ओळखीचं रूपांतर प्रेमात व प्रेमाची परीणीती विवाहात झाले. लग्नानंतर दोघे मायानगरी मुंबईत आले. (Singer Roshan)
केदार शर्मा यांनी रोशनला पहिला सिनेमा दिला १९४८ साल ’ नेकी और बदी’ सिनेमा चालला नाही पण शर्मांनी त्यांना आणखी एक संधी दिली ’बावरे नैन’करीता. रोशनची गाणी हिट ठरली. ‘खयालो में किसीके इस तरह आया नही करते’, ‘ तेरी दुनिया में दिल लगता नही’, ‘मुझे साच साच बता दो क्या’ ही गाणी आणि सिनेमा सुपर हिट ठरला. मग मात्र त्यांना कधी मागे वळून पहावं लागलं नाही.कव्वाली हा त्यांचा खास प्रांत होता.’न तो कॉरवां की तलाश है ही तब्बल १३ मिनिटांची ’बरसात की एक रात’ ची कव्वाली आजही सर्वोत्कृष्टतेचा मान पटकावून आहे.पण रोशन यांची गणना कधीच चोटीच्या संगीतकारात झाली नाही हे त्यांच्या मनीचं शल्य होतं.
त्यांनी संगीत दिलेल्या अखेरच्या सिनेमातील एका गाण्याचा किस्सा वाचकांना देखील चटका लावून जाईल. असित सेन दिग्दर्शित ’अनोकी रात’चं संगीत रोशन देत होते. इंदीवर यांनी फार सुंदर गाणी लिहिली होती.रोशन आणि त्यांची पत्नी इरा कायम या सिनेमाच्य संगीताबाबत विचार करत.रोशन करीता हा सिनेमा म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट होता. सिनेमातील इतर गाणी (’ओह रे ताल मिले नदी के जलमे ’ ’मिले न फूल तो कॉंटोसे दोस्ती कर ली’ ’दुल्हन से तुम्हारा मिलन होगा ’) तयार होती.फक्त एका गाण्याचं रेकॉर्डींग बाकी होतं.आणि याच वेळी १६ नोव्हेंबर १९६७ रोजी वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी हृदयविकाराचा तीव्र झटका येवून त्यांच निधन झालं. (Singer Roshan)
असित सेन यांनी उरलेल्या एका गाण्यासाठी संगीतकार सलील चौधरी यांना बोलवायचं ठरवलं. पण रोशन यांची पत्नी इरा दिग्दर्शक असित सेन यांना भेटून ते उर्वरीत गाणे स्वत:च्या संयोजनात रेकॉर्ड करणार असल्याचे सांगितले.कारण या गाण्यासाठी रोशन यांनी दिवसरात्र घेतलेली मेहनत इराने पाहिली होती.हे गाणं रोशनच्या चालीत ध्वनीमुद्रीत करून त्यांना आदरांजली द्यायची होती.इरा यांचे कलाप्रेम असित सेन यांना माहित होते. त्यांनी परवानगी दिली.(Singer Roshan)
===========
हे देखील वाचा : आराधनाच्या प्रीमियरला देवानंदने काय केली भविष्यवाणी…
===========
सलीलदांनी सिनेमाचं पार्श्व संगीत केलं आणि लताच्या स्वरात हे अप्रतिम गाणे तयार झाले.गाण्याचे बोल होते.”महलों का राजा मिला, हमारी बेटी राज करेगी, ख़ुशी ख़ुशी कर दो विदा, हमारी बेटी राज करेगी…” रेकॉर्डींगच्या वेळी इरा यांचे डोळे सारखे भरून येत होते.’अनोखी रात’ सिनेमाला यश मिळालं नसलं तरी त्यातील गाणी आजही काळजाचा ठाव घेतात. या गाण्याची चाल रोशनपुत्र राजेश रोशनला इतकी आवडली की त्याने ऐंशीच्या दशकात ’खुदगर्ज’ या सिनेमात नितिन मुकेश – साधना सरगम च्या स्वरातील एका गीतात जशीच्या तशी वापरली.ते गाणं होतं “यहीं कहीं जियरा हमार, ए गोरिया गुम होई गवा रे…”