Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Naal 2 Movie Song: ‘नाळ भाग २’मधील ‘भिंगोरी’गाणे श्रोत्यांच्या भेटीला 

 Naal 2 Movie Song: ‘नाळ भाग २’मधील ‘भिंगोरी’गाणे श्रोत्यांच्या भेटीला 
kalakruti-naal-2-movie-song-bhingori-song-from-naal-part-2-hits-theatres-marathi-info/
मिक्स मसाला

Naal 2 Movie Song: ‘नाळ भाग २’मधील ‘भिंगोरी’गाणे श्रोत्यांच्या भेटीला 

by Team KalakrutiMedia 23/10/2023

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे.(Naal 2 Movie Song)

Naal 2 Movie Song
Naal 2 Movie Song

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ साली ‘नाळ’मध्ये विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. त्या पात्रात पाणी कमी, आणि वाळवंट जास्त होतं. असं असूनही पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दिसला होता. ती कमाल होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची. तर अशा रखरखीत वातावरणातही माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता ‘नाळ २’ मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आलाय.

Naal 2 Movie Song
Naal 2 Movie Song

‘भिंगोरी’ या गाण्यातून नजरेत भरतं ते पश्चिम महाराष्ट्रात डोंगररांगांनी वेढलेल्या गावाचं निसर्गसौंदर्य आणि या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदी झालेले गावकरी. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण इथून पुढे त्याच्या हा प्रवास नेमका कुठवर जातो ती कहाणी चित्रपटात बघायला मिळेल. ‘जाऊ दे ना वं’ या पहिल्या भागातील लोकप्रिय गाण्यानंतर आता ‘भिंगोरी’ या गाण्यातून चैतूच्या या प्रवासाची सुरुवात बघायला मिळतेय. नात्यांमधले चढ-उतार आणि गुंता हा चैतूच्या अल्लड वयाला झेपेल का अशाच प्रश्न प्रेक्षकांना पडत असणार.(Naal 2 Movie Song)

=====================

हे देखील वाचा: Naal 2: नागराज पोपटराव मंजुळे घेऊन येत आहेत ‘नाळ भाग २’

=====================

१० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘नाळ’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी म्हणतात, ‘’ गावातील खूप छोट्या छोट्या गोष्टी या गाण्यात टिपण्यात आल्या आहेत. गाण्याची टीमही अतिशय जबरदस्त आहे. ज्याप्रमाणे ‘नाळ’च्या गाण्यावर प्रेक्षकांनी प्रेम केले तसेच प्रेम ‘नाळ भाग २’मधील गाण्यांवरही करतील याची खात्री आहे. ‘’

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment marathi movie 2023 Naal 2 Movie Song naal marathi movie Nagraj Manjule nagraj popatrao manjule
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.