
Nagraj Manjule : ” ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट मी करायला हवा होता”
‘आता थांबायचं नाय’ हा केवळ चित्रपट नाही तर तो महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जिद्दीचा, आत्मभान मिळवण्याच्या प्रवासाचा सजीव दस्तऐवज आहे. मुंबई महापालिकेतील काही सफाई कामगारांनी शिक्षणाच्या आधारावर आपल्या आयुष्याला दिलेली नवी दिशा ही खरी घटना या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. हा सिनेमा केवळ महानगरपालिकेच्या चौकटीत अडकत नाही. यावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nagraj Manjule)

या कलाकृतीबद्दल राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले, “ही फिल्म मीच करायला हवी होती. माझी फिल्म असावी असं माझं म्हणणं असणारी ही गोष्ट आहे. शिवराज वायचळचं काम पाहून वाटलं, आपली जुनीच ओळख आहे. बवेश जानवलेकर यांच्या नेतृत्वाखाली झी स्टुडिओज् मराठीची ही पहिली निर्मिती आणि याहून चांगली सुरुवात असू शकत नाही!”
==============================
हे देखील वाचा: Atali Batmi Fhutali: अभिनेते विजय निकम झाले ‘टायगर भाई’!
===============================
‘सैराट’ सारखा ऐतिहासिक 100 कोटींचा गल्ला जमवलेला मराठी चित्रपट झी स्टुडिओसोबतच देणाऱ्या मंजुळे यांचं हे विधान, ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटासाठी मोठी पावती ठरते. शिवराज वायचळ दिग्दर्शित, आणि झी स्टुडिओ निर्मित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हणमघर, ओम भुतकर, पर्ण पेठे, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर , श्रीकांत यादव, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांसारखे दर्जेदार कलाकार आहेत. (Aata Thambaych nay movie cast)