
Namrata Sambherao : ‘खूपच भारी वाटतंय, कारण….’ नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा शो प्रत्येक मराठी माणसाचा आवडता शो आहे. या शोचा चाहता नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. या शोच्या निमित्ताने मराठी मनोरंजनविश्वाला अनेक विनोदी कलाकार मिळाले. या शोमध्ये केवळ अभिनय करणारेच कलाकार आहेत असे अजिबातच नाही. या शोमधील बरेच कलाकार उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. असाच एक प्रगल्भ अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar).
प्रसादच्या विनोदाचे आणि त्याच्या अभिनयाचे सर्वच फॅन्स आहेत. मात्र त्याचे लेखन आणि दिग्दर्शक देखील प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. नुकताच प्रसादने दिग्दर्शित केलेला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (CHIKI CHIKI BOOBOOM BOOM) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विनोदी चित्रपट असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमात दमदार कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून नम्रता संभेरावने खास पोस्ट लिहिली आहे. (Namrata Sambherao)
======
हे देखील वाचा : Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग
======
नम्रताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “Congratulations pashya proud of you
आपला दुसरा सिनेमा चिकी चिकी बुबुम बूम हा चित्रपटगृहात अतिशय उदंड प्रतिसादात चालू आहे. काही भागात तर housefull होतोय हे ऐकून खूपच भारी वाटतंय, कारण “अरे ते थिएटर housefull झालंय, प्रेक्षक गर्दी करतायत” (Marathi Top Stories)
A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)
हे ऐकायला आपले कान आसुसलेले असतात. प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडतोय, मनमुराद आनंद लुटतायत ते चित्रपटाचा आणि तोच आनंद तुझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे झळकतोय जे जे रसिक आमच्यावर प्रेम करतात त्यांना मी खात्रीने सांगू शकते २ तास निखळ हास्य हवं असेल चेहऱ्यावर तर हा चित्रपट नक्की पहा . आपल्या कुटुंबासोबत मित्रांसोबत हा सिनेमा तुम्ही अजून जास्त enjoy करू शकता. रसिकहो नाटकाला तुम्ही जसा उदंड प्रतिसाद देता, तसाच उत्साह चित्रपटगृहात देखील आम्हाला बघायचा आहे, housefull च्या पाट्यांचा आनंद तुमच्यामुळेच अनुभवता येतो आणि अधिकाधिक उत्तम काम करण्याचा आणि तुमचं मनोरंजन करण्याचा उत्साह देखील तुमच्यामुळेच निर्माण होतो. (Marathi Entertainment News)
१७ कलाकार एका गोष्टीत गुंफले गेलेत त्यात ते काय धमाल करू शकतात हे बघण्याची मज्जा तुम्हाला मोठ्या पडद्यावर लुटता येईल. त्यामुळे कळकळीची विनंती चित्रपटगृहात जाऊनच सिनेमा बघा आपल्या चित्रपटाला भरभरून यश मिळावं ह्या सदिच्छा तुला असाच मोठा हो खुश रहा आणि उत्तम कलाकृती बनवत रहा.” (Marathi Movie)
======
हे देखील वाचा : Gargi Phule : अभिनेत्री गार्गी फुलेची ‘या’ कारणामुळे मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती
======
दरम्यान या सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे आदी कलाकार दिसणार आहेत. या सिनेमात नम्रता पाहुण्या कलाकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर कमालीचा गाजला, त्यामुळे हा सिनेमा देखील ब्लॉकबस्टर होईल यात शंका नाही. (Marathi Movie News)