Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Smita Patil :’सीने में जलन आंखों में तुफान सा क्यू है….’
मुंबई महानगरी हा एक अजस्त्र अजगर आहे. तो आलेल्या प्रत्येकाला गिळंकृत करून टाकत असतो. पोटाची खळगी भरायला आलेला प्रत्येक जीव या मुंबईत सामावला जातो. या शहराने हिंदुस्तानातील प्रत्येक कष्टकरी गरीब जीवाला आपलंसं केलं.या महानगरीतील कष्टकरी समाजाचं जीणं सिनेमाच्या पडद्यावर अनेकदा मांडलं गेलं. १९७८ साली मुजफ्फर अली यांनी ‘गमन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा संपूर्ण सिनेमा महानगरीतील आपल्या अस्तित्वाकरीता झगडणार्या समाजाचा आहे.
दिग्दर्शनातील हा मुजफ्फर अली यांचा हा पहिलाच प्रयोग होता आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झाले होते. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. फारुख शेख, स्मिता पाटील, जलाल आगा, नाना पाटेकर आणि गीता सिद्धार्थ यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. संगीतकार जयदेव यांचे अप्रतिम संगीत, चित्रपटातील ठिबकणारे दु:ख प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ हातभार लावणारे होते. संपूर्ण चित्रपटाला एक दुःखाची,वेदनेची किनार आहे. यातील प्रत्येक पात्राचा एकच गुन्हा आहे तो म्हणजे हे सर्वजण ‘मुफलीस’ आहेत ‘गरीब’ आहेत.

भांडवलशाही व्यवस्थेत कष्टकरी समाजाची होणारे होरपळ फार प्रभावीपणे या चित्रपटात दाखवली आहे. दिग्दर्शक
मुजफ्फर अली यांचा हा पहिला चित्रपट. २१ ऑक्टोबर १९४४ रोजी अवध जवळच्या कोटवारा या प्रिन्सली स्टेट मध्ये एका राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मधून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतली. काही काळ त्यांनी जाहिरात एजन्सी मध्ये काम केले.काही शोर्ट फिल्म्स बनवल्या. ते स्वतः उत्तम चित्रकार होते. जाहिरात क्षेत्रात वावरल्यामुळे सामाजिक व्यंग त्यांना खूप चांगल्या पद्धतीने दिसायचे. यातूनच त्यांची पहिली कलाकृती ‘गमन’ तयार झाली.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
यानंतर तीनच वर्षांनी १९८१ साली त्यांनी ‘उमराव जान’ हा एक क्लासिक चित्रपट दिग्दर्शित केला. ‘गमन’चित्रपटाचे कथानक उत्तर प्रदेशात एका ग्रामीण भागात सुरू होते. गुलाम हसन (फारुक शेख) आणि त्याची बायको खैरून (स्मिता पाटील) आपल्या वृद्ध आई सोबत राहत असतो. उत्तर प्रदेशांमध्ये जमीनदारीमध्ये त्यांची जमीन सावकाराने हडपलेली असते. गावात त्याला काहीच कामधंदा नसतो. शेतातून येणाऱ्या एक चौथाई उत्पन्नातून त्यांची भूक देखील भागत नसते. दारिद्र्याचे चटके चोहोबाजूला बसत असतात. त्यामुळे फारुख शेख मुंबईला पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी जातो.

आपल्या आईचा आणि बायकोचा निरोप घेताना तो गलबलून जातो. परंतु भावनेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ म्हणून तो महानगरीत येतो. इथे त्याचा मित्र लल्लू (जलाल आगा) टॅक्सी चालक असतो. लल्लू सोबत तो देखील टॅक्सी चालवतो आणि महिन्याला पन्नास रुपये घरी मनीऑर्डर करत असतो. मुंबईत झोपडपट्टीत हे दोघेजण राहत असतात. यशोधरा (गीता सिद्धार्थ) एका मराठी कुटुंबातील मुलगी असते. तिचे लल्लू वर प्रेम असते. तिच्या घरी सुद्धा अठरा विश्व दारिद्र्य असते. तिचा भाऊ वासू (नाना पाटेकर) हा बेकार असतो. आपल्या बहिणीला दुबईला पाठवून तिच्या पैशावर ऐश करण्याचा त्यांचा प्लॅन असतो. परंतु यशोधराचा याला विरोध असतो.
तिकडे गावी फारुक शेख ची आई घरात पडते आणि तिचे कमरेचे हाड मोडते. मोठा खर्च निर्माण होतो. फारूक शेख मुंबईत सगळ्यांना पैसे मागतो परंतु सगळी कडून त्याला नकारात्मक उत्तर मिळते. गरिबी, दारिद्र्य यामुळे सगळ्या आयुष्याचा तमाशा झालेला असतो. तिकडे यशोधरे वरचा भावाचा बाव पराकोटीला पोहोचतो आणि सर्व प्रश्नाच्या मुळाशी ‘यशोधराचे लल्लूवर असलेलं प्रेम आहे’ तेच खतम करायचं म्हणून वासू लल्लूचा खून करतो! इकडे फारुक शेख हा सगळा प्रकार बघून प्रचंड हताश होतो. गरीबी, दारिद्र्य या सोबत लढायचे कसे? गावी पैसे पाठवायचे का? का सरळ आईला जाऊन भेटायचे? गावी जावून करायचे काय? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. या प्रश्नात तो पुरता गुरफटून जातो.

रोज रेल्वे स्टेशनवर जाऊन आपल्या गावी जाणाऱ्या ट्रेन कडे पाहून आणखी हाताश होतो. मुंबई मायानगरीतील हे भयावह वास्तव दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी फार चांगल्या रीतीने रुपेरी पडदार मांडले आहे. लल्लू चा मृत्यूनंतर गुलाम महानगरीमध्ये अक्षरशः एकटा पडतो. रोज रेल्वे स्टेशनवर जाऊन हताश पणे आपल्या गावाकडे जाणाऱ्या रेल्वेला पाहत असतो. मुंबई नामक महानगरीच्या तुरुंगात आता तो कैद झालेला असतो. या शहरात आगमन प्रत्येकाचं होऊ शकतं पण पुन्हा गमन कधी होणार हा प्रश्न आयुष्यभर छळत रहातो. मुंबई नगरी खरोखरच मोठा अजगर आहे जो इथेआलेल्या प्रत्येकाला गिळंकृत करतो.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे जनरली आपल्याकडे शहरातील जीवन हे कष्टाचं दुःखाचं तर गावाकडील जीवन म्हणजे सुखाचं अशी विभागणी आपल्याकडे केली जाते. पण इथे ‘गमन’ या चित्रपटांमध्ये गाव आणि शहर या दोन्हीकडे यातना आहेत, दुःख आहे, वेदना आहेत. यातील गुलाम या प्रामाणिक युवकाचा प्रवास हा दुःखा कडून दुःखाकडे जाताना दाखवला
आहे! चित्रपटाला जयदेव यांचे संगीत आहे. यातील ‘सीने मे जलन आखो मे तुफान सा क्यू है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूं है…’ सुरेश वाडकर यांनी गायलेले गाणे मुंबईच्या कष्टकरी समाजाचे भावजीवन उलगडून सांगणार आहे. छाया गांगुली यांच्या स्वरातील आपकी याद आती रही हे गाणं देखील अतिशय सुंदर आहे. हरीहरन ने एक गीत गायलं आहे.

यात जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका हिरादेवी यांनी गायलेली ठुमरी होती रसके भरे तोरे नैन सांवरिया …. चित्रपटातील गाणी शहरीयार आणि मखदूम मोइनोद्दीन यांनी लिहिली होती. या चित्रपटाला त्या वर्षीतील राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. मुजफ्फर अली (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) छाया गांगुली (सर्वोत्कृष्ट गायिका) संगीतकार जयदेव (सर्वोत्कृष्ट संगीतकार) असे हे तीन मानाचे राष्ट्रीय पुरस्कार होते. फारूक शेख याने यात रंगवलेला गुलाम फार सुंदर होता. स्मिताला त्यामानाने चित्रपटात छोटी भूमिका आहे. भांडवलशाही दुनियेत कष्टकरी, मुफलीस/ गरीब,लाचार जिंदगानीची कुचंबना फार प्रभावीपणे या चित्रपटातून दाखवली आहे! युट्युब वर हा सिनेमा नि:शुल्क उपलब्ध आहे.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi