Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

‘SSMB29’ : १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट बॉलिवूडच्या ‘या’ कलाकाराने नाकारला!
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिग बजेट एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘SSMB29’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा त्याच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट असणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर यात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) दिसणार असून बऱ्याच वर्षांनी ती पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का इंडस्ट्रीतील एका सिनियर कलाकाराने चक्क राजामौलींचा १००० कोटींचा हा चित्रपट नाकारला आहे.(Entertainment tadaka)

तर, एसएस राजामौली दिग्दर्शित महेश बाबू व प्रियांका चोप्राची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘SSMB29’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरही (Nana Patekar) असणार होते. पण त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाना पाटेकर यांना राजामौलींनी महेश बाबूच्या वडिलांच्या भूमिकेसाठी ऑफर दिली होती. त्यांच्या भूमिकेबद्दल सांगण्यासाठी स्वत: राजामौली नाना पाटेकरांना भेटायलाही गेले होते. त्यांनी चित्रपटाची कथा नानांना ऐकवली आणि त्यानंतर नानांना २० कोटींचं मानधनही ऑफर केलं गेलं होतं. मात्र, कलाकार म्हणून या भूमिकेत वेगळं काही करण्यासाठी नसल्यामुळे नानांनी राजामौली यांना नकार देत चित्रपटातून एक्झिट घेतली.(Bollywood news)
================================
हे देखील वाचा: ‘कजरा रे’ गाण्याबद्दल Amitabh Bachchan यांना होती शंका, शुट करायला दिलेला नकार
=================================
दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘SSMB29’ हा पहिला बिग बजेट चित्रपट असून प्रेक्षकांची या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा आहे. चित्रपटाच्या रिलीजबद्दल सांगायचं झालं तर RRR चित्रपटाला २०२७ मध्ये ५ वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्याचवेळी ‘SSMB29’ रिलीज होणार असं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा न केल्यामुळे काही ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, ४-५ वर्षांनंतर प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) भारतीय चित्रपटात दिसणार असून तिने बॉलिवूड ऐवजी दाक्षिणात्य चित्रपटाला प्राधान्य दिल्यामुळे सगळ्यांच्याच भूवय्या उंचावल्या आहेत. तर, नाना पाटेकर लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत. (South Indian films)