Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nana Patekar चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेणार? म्हणाले, “मी आता नवीन सुरुवात…”

 Nana Patekar चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेणार? म्हणाले, “मी आता नवीन सुरुवात…”
मिक्स मसाला

Nana Patekar चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेणार? म्हणाले, “मी आता नवीन सुरुवात…”

by रसिका शिंदे-पॉल 15/09/2025

विविधांगी भूमिका साकारत ७०च्या दशकापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तत्पर असतात… अभिनेते मकरंद अनासपुरेंसोबत नाम फाऊंडेशन संस्थेत गेली अनेक वर्ष ते काम करत आहेत… नुकतीच या संस्थेला १० वर्ष पुर्ण झाली… यावेळी आयोजित एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी अभिनयातून निवृत्त होण्यावर भाष्य केलं आहे… नेमकं नाना काय म्हणाले? जाणून घेऊयात…

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘प्लॅनेट मराठी’शी संवाद साधला. त्या मुलाखतीत नानांना विचारलं की, तुम्ही नुकतीच घोषणा केली की, चित्रपटसृष्टीतून मी लवकरच निवृत्त होणार आहे. त्यावर नाना पाटेकरांनी उत्तर दिलं की, “कधीतरी एखादी भूमिका आली. मला आवडली, छान वाटली, चित्रपट करावासा वाटला, तर मी करेन. पण, आता प्रामुख्याने ते करतोय, ते बंद करेन. ७५ वर्षे म्हणजे खूप होतात.”

पुढे नाना म्हणाले की, “मी वयाच्या १३ व्या वर्षापासून नोकरी करतोय. १३ वर्षापासून ते आता ७५ वर्षांपर्यंत मी काम करतोय. आता काहीतरी वेगळं जे आवडतंय, मनापासून जे करावंसं वाटतं, ते करेन. ‘नाम’च्या माध्यमातून जे करतोय, ते करेन. कुठेतरी आपण थांबायचं असतं.”(Marathi Movie)

नाना यांनी पुढे असं देखील म्हटलं की, “माझा अतिशय आदर्श असलेला नट आणि त्याच्यासमोर मी हात जोडतो तो विक्रम गोखले. एरवी मी फारसा हलत नाही. पण, विक्रम गेल्यानंतर मला थोडा त्रास झाला. तो त्रास आजही होत राहतो. मला असं वाटतं की, काहीतरी त्याच्याही मनातल्या गोष्टी आहेत, त्या राहिल्या आहेत. तर त्या गोष्टी मी या माध्यमातून पूर्ण करू शकेन. तो माझा थोरला भाऊ होता. काही मंडळी आयुष्यभर तुम्हाला आर्शिवादच देत राहतात. त्यातला विक्रम होता. बरं मी ज्यावेळी काम बंद करेन, त्यावेळी दुसरा कोणीतरी माझी जागा घ्यायला येईल. नवीन लोकं येत राहतात. मी रिटायर होत नाही, तर मी पुन्हा नवीन सुरुवात करतोय. या एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जातोय. पण, नवीन काहीतरी सुरुवात करतोय. सतत गावागावांत जायचं. लोकांना भेटायचं. देवळात राहायचं, तिथेच काहीतरी खायचं. तिथूनच पुढे जायचं.”

================================

हे देखील वाचा : Nana Patekar : ‘माझ्या गरजा साध्या’ नाना पाटेकरांचे गावात राहण्याबद्दल वक्तव्य

=================================

“आता कसं मी कुठेही गेलो तरी मला छान छान हॉटेलमध्ये राहता येतं. छान बडदास्त असते. हे सगळं विसरायचं आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगायचं. हे नाव वगैरे सगळं त्यांच्यामुळे आहे. जे ऐश्वर्य आहे ते माझ्यासाठी खूप आहे. देवाकडे आम्ही थोडं मागितलं होतं. देवानं दोन्ही हातांत मावणार नाही इतकं दिलं. त्यामुळे फार खूश आहोत.” आता नाना पाटेकरांनी उल्लेख केलेलं नवं क्षेत्र कोणतं असेल आणि खरंच पुन्हा ते मोठ्या पडद्यावर दिसणार नाहीत का हे येणारा काळचं सांगेल…(Nana Patekar News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood update Entertainment nana patekar nana patekar movies nana patekar retirement news vikram gokhale
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.