‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती
बॉलिवूडमधला कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील हाऊसफुल्ल फ्रेंचायझी प्रचंड यशस्वी झाली आहे. नुकत्याच या फ्रेचायझीमधील ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5 movie) चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणाऱ्या या चित्रपटात तब्बल १८ दर्जेदार कलाकार होते. आजवर अनेक मल्टी स्टारकास्ट असणारे चित्रपट आले पण १८ कलाकार असणारा हा कदाचित पहिलाच चित्रपट असावा. या चित्रपटातील कथा, विनोद यांची जितकी चर्चा झाली त्याहून जास्त स्टारकास्टची चर्चा झाली. तुम्हाला माहित आहे का या चित्रपटातील प्रमुख आकर्षण असणारी नाना पाटेकरांनी (Nana Patekar) भूमिका आधी बॉलिवूडच्या एका वेगळ्याच सुपरस्टारला ऑफर केली होती. कोण होता तो कलाकार जाणून घेऊयात…(Bollywood News)

‘हाऊसफुल ५’ हा केवळ कॉमेडी चित्रपट नसून यात एक मर्डर मिस्ट्री देखील लपली आहे. आणि या खुनाचा तपास करण्यासाठी चित्रपटात तीन पोलिस ऑफिसर्स दाखवले आहेत. संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर. इन्सपेक्टर दगडू ही भूमिका नाना पाटेकरांनी उत्कृष्ट जरी साकारली असली तरी आधी ही भूमिका महानायक अमिताभ बच्चन यांना साजिद नाडीयाडवाला याने ऑफर केली होती आणि संजय दत्त याने साकारलेली भूमिका नाना पाटेकरांनी साकारावी असं गणित मांडलं होतं. मात्र, सध्या फारच सिलेक्टिव्ह चित्रपट आणि भूमिका स्वीकारणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ही भूमिका नम्रपणे नाकारली आणि नाना पाटेकरांच्या पदरात दगडू ही भूमिका पडली.(Entertainment)

तर, बॉलिवूड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, साजिद नाडियाडवाला यांनी संजय दत्तची भूमिका नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफची भूमिका अनिल कपूरला (Anil Kapoor) ऑफर केली होती. कारण,पुन्हा एकदा या चित्रपटात त्यांना उदय आणि मजनूची जोडी दाखवायची होती. मात्र, अनिल कपूर यांनी नकार दिल्यामुळे संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ ही नवी जोडी प्रेक्षकांना दिसली. (Latest Bollywood News)
================================
=================================
दरम्यान, हाऊसफुल्ल ५ चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाकरी, चित्रगंधा सिंग, जॉनी लिव्हर असे अनेक कलाकार आहेत. ५ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. (Housefull 5 Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi