
Nana Patekar करणार होते वर्ल्ड रेकॉर्ड पण नेमकं अडलं कुठे?
‘एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है…’ हा आयकॉनिक डायलॉग आठवला की नाना पाटेकर यांचा (Nana Patekar) चेहरा डोळ्यांसमोर येतोच… फक्त हात नाही तर असे बरेच डायलॉग्स आणि सुपरहिट चित्रपट देणाऱ्या नानांनी मराठी रंगभूमी ते हिंदी चित्रपट असा प्रवास केला… मुळात चित्रपटांमध्ये कधीच करिअर न करण्याचं प्लॅनिग असणाऱ्या नानांना ग्रेट स्मिता पाटील (Smita Patil) यांनी हात पकडून फिल्मी दुनियेत आणलं… आणि त्यानंतर जवळपास ५० वर्ष ते इंडस्ट्रीवर राज्य करतायत… आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या नाना पाटेकरांच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता… पण नेमका तो पुर्ण का झाला नाही आणि तो रेकॉर्ड काय होता जाणून घेऊयात…

नाना पाटेकरांचा १९७८ साली पहिला चित्रपट ‘गमन’ रिलीज झाला होता… देशभक्तीपर, कॉमेडी, खलनायकी भूमिका असे वेगवेगळे प्रोजक्ट्स करणारे नाना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाचा भाग होणार होते…. हो… तर, दिग्दर्शक मेहुल कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मेहुल कुमार यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या चित्रपटाचं नाव नोंदवायचं होतं… नॉर्मली एखादा चित्रपट शुट व्हायला ३० ते ६० दिवस जातात… पण मेहुल कुमार यांना फक्त १८ तासांत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड करायचा होता. त्यासाठी ३५ कॅमेरे, १८ युनिट वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी शूटिंग करतील, असा त्यांच्या डोक्यात विचार होता. नाना पाटेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावावरही झाला असता. (Nana Patekar World Record)

परंतु, बाकी काही चित्रपटांप्रमाणे यादेखील चित्रपटाची घोषणा झाली पण शुटींग झालं नाही… मेहुल कुमार यांची कल्पना प्रत्यक्षात आली नाही. आणि नाना पाटेकरांच्या नावावर होणारा एक वर्ल्ड रेकॉर्ड अपूर्णच राहिला… बरं, जरी हा रेकॉर्ड झाला नसला तरी नानांनी बरेच पुरस्कार आपल्या नावे केले आहेत… तसेच, त्यांना २०१३ मध्ये पद्मश्री देखील प्रदान करण्यात आला होता… विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नानांनी २०२५ मध्ये रिलीज झालेल्या हाऊसफुल्ल ५ मध्ये पोलिसाची भूमिका केली होती… (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Shah Rukh Khan : डायलॉगमध्ये छोटीशी चूक आणि सेटवर किंग खानने मागितली सगळ्यांची माफी!
================================
आता नव्या वर्षात नाना ‘ओ रोमिओ’ (O Romeo) या चित्रपटात दिसणार असून त्यांच्यासोबत यात शाहिद कपूर (Shahid Kapoor) दिसणार आहे… फेब्रुवारी २०२६मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असं सांगितलं जात असून ९०च्या दशकातील गॅगस्टर्स ड्रामा असणार आहे… या मुव्ही व्यतिरिक्त The Confession आणि कुकु की कुंडली हे दोन चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत… नाना पाटेकर यांनी ‘सिंहासन’, ‘गिध’, ‘आज की आवाज’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘वजूद’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘वेलकम’, ‘नटसम्राट’, ‘ओले आले’, ‘वनवास’, ‘तिरंगा’, ‘क्रांतीवीर’ असा बऱ्याच चित्रपटांत कामं केली आहेत… (Nana Patekar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi