Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Nandamuri Taraka Rama Rao: एक असा कलाकार ज्याने १७ सिनेमांमध्ये साकारले ‘कृष्ण’; लोक देव समजून करायचे अभिनेत्याची पूजा…
Nandamuri Taraka Rama Rao: भारतीय चित्रपटसृष्टी आणि विशेषतः तेलुगू चित्रपटसृष्टीचा इतिहास ‘एन. टी. रामाराव’ (Nandamuri Taraka Rama Rao – NTR) यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. एनटीआर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पौराणिक भूमिका साकारल्या, विशेषतः भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या. त्यांच्या अभिनयाची ताकद इतकी प्रभावी होती की प्रेक्षक त्यांना खरोखरच देव मानू लागले. त्यांच्या सहज हास्याने, तेजस्वी नेत्रांनी आणि आत्मीय अभिनयशैलीने त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे रूप इतके जिवंत केले की ग्रामीण भागांमध्ये त्यांच्या फोटोला देव्हाऱ्यात स्थान मिळाले.(Nandamuri Taraka Rama Rao As Krishna)

१९५७ मध्ये आलेला ‘माया बाजार’ हा एनटीआर यांचा एक माइलस्टोन ठरलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका केली होती. विशेषतः ‘श्री कृष्णार्जुन युद्धम्’ (१९६३) या चित्रपटात त्यांनी एकाच सिनेमात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि श्रीराम या तीनही भूमिका साकारल्या. या भूमिकांमध्ये त्यांनी वेगवेगळी शरीरभाषा, संवादफेक आणि हावभाव यांचा वापर करत अभिनयाच्या सर्वोच्च शिखराला गवसणी घातली.एनटीआर यांची एक खासियत म्हणजे ते स्वतः आपल्या पौराणिक पात्रांसाठी मेकअप करत असत. पोशाख, दागदागिने आणि मुद्रांवर ते तासन् तास अभ्यास करत, कारण त्यांच्या दृष्टीने हे फक्त पात्र नव्हते, तर एक आध्यात्मिक साधना होती.

त्यांनी एकट्या भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेतच १७ चित्रपटांत काम केलं जे आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याला शक्य झालं नाही. ते फक्त भारतापुरतेच मर्यादित नव्हते. फिजी, मलेशिया आणि अमेरिका येथे राहणाऱ्या तेलुगू समाजामध्येही एनटीआर यांचा प्रभाव प्रचंड होता. त्यांच्या चित्रपटांची स्क्रीनिंग परदेशात होई आणि तिथेही लोक त्यांच्यावर तितकेच प्रेम करत. एनटीआर फक्त एक महान अभिनेता नव्हते. त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती आणि नंतर राजकारणातही आपला ठसा उमटवला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. समाजसेवा हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.(Nandamuri Taraka Rama Rao As Krishna)
=====================================
=====================================
एनटी रामाराव हे फक्त कलाकार नव्हते, ते एक युग होते. त्यांच्या अभिनयात भक्ती होती, त्यांच्या भूमिकांमध्ये आत्मा होती आणि त्यांच्या कार्यात समाजप्रेम.आता त्यांच्या आठवणींसोबतच नव्हे, तर त्यांच्या मूल्यांसोबतही जोडते. त्यांचं योगदान अमर आहे आणि त्यांचा प्रभाव अजूनही जिवंत आहे.