Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Nashibvan Serial: बाजीप्रभू साकारणाऱ्या अभिनेत्याचे तब्बल सहा वर्षांनंतर मालिकाविश्वात खलनायक म्हणून कमबॅक!
Star Pravah वाहिनीवर लवकरच एक नवीकोरी आणि हृदयाला भिडणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याच नाव आहे “नशीबवान”. नुकताच या मालिकेचा प्रदर्शित झालेला टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही कथा आहे गिरीजा नावाच्या एका तरुणीची, जिचं आयुष्य खडतर संघर्षांनी भरलेलं आहे. आई-वडिलांचं प्रेम तिच्या वाट्याला आलं नाही, लहान वयातच घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली आणि जगण्यासाठी अखंड झगडण्याची वेळ आली. तरीही, या कठीण प्रवासात ती स्वतःला ‘नशीबवान’ का समजते, याचा सुंदर उलगडा या मालिकेतून होणार आहे. गिरीजा नेमकी कशी आणि का नशीबवान ठरते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकेची कथा अनुभवावी लागेल.(Nashibvan Marathi Serial)

या मालिकेचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित आणि दमदार अभिनेता तब्बल सहा वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अजय पूरकर आहेत. मोठ्या पडद्यावर लक्षवेधी भूमिका साकारणारे अजय पूरकर या मालिकेत खलनायकाच्या दमदार अवतारात दिसणार आहेत. त्यांचं पात्र आहे नागेश्वर घोरपडे. पैशांच्या जोरावर सामान्य लोकांना त्रास देणारा, खून करण्यासही मागेपुढे न पाहणारा, देवीची पूजा करणारा पण वागणुकीत राक्षसी क्रूरता असलेला नागेश्वर, इतका प्रभावशाली आहे की तरीही तो कधीच कोणत्याच केसमध्ये अडकत नाही.

या भूमिकेबद्दल अजय पूरकर सांगतात की, “जवळपास सहा वर्षांनंतर मालिकेत काम करत आहे. नागेश्वरचं पात्र ऐकताच मला खूप आवडलं. स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी प्रतिष्ठित निर्मिती संस्था असताना ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. महेश कोठारे यांच्यासोबत काम करण्याचं माझं स्वप्न या मालिकेमुळे पूर्ण होतं आहे. नागेश्वरच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत आणि त्याच्या आजूबाजूला मालिकेची कथा गुंफलेली आहे. याआधी मी इतका प्रभावशाली खलनायक कधीच साकारलेला नाही, त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी एक मोठं आव्हान असेल.”(Nashibvan Marathi Serial)
===========================
============================
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी “नशीबवान” ही मालिका नाट्य, भावना आणि रोमहर्षक वळणांनी भरलेली असेल, हे नक्की. “नशीबवान” मालिका आपल्याला स्टार प्रवाह या वाहिनीवर पाहता येणार आहे.