Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

ठरलं! मुख्यमंत्री शिवाजी रावच्या भूमिकेत पुन्हा दिसणार अनिल कपूर; Nayak 2 लवकरच येणार भेटीला
९०-२०००च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अनिल कपूर यांचा ‘नायक’ हा चित्रपट फारच गाजला. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर Ahead of the time असा असणाऱ्या या राजकीय चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सामान्य माणूस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसावा अशी लोकांची इच्छा होतीच आणि तिच इच्छा २००१ मध्ये आलेल्या ‘नायक’ (Nayak) चित्रपटातून पूर्ण झाली होती. पत्रकार एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो आणि संपूर्ण देशाचं राजकारणच पालटतो. आणि आता पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री शिवाजीराव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनिल कपूर ‘नायक २’ मधून समोर येणार असून या सीक्वेलबद्दल अपडेट समोर आली आहे. (Anil Kapoor Nayak 2)
तर, २५ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नायक’ चित्रपटात अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एस.शंकर दिग्दर्शित नायक चित्रपट हा राजकीय चित्रपटांच्या यादीतील एक कल्ट चित्रपट मानला जातो. आणि आता याच चित्रपटाचा सिक्वेल त मेकर्स यार करण्याच्या तयारीत असून अनिल कपूर यांनी नुकतेच ‘नायक’ (Nayak) चित्रपटाचे हक्क चित्रपटाचे निर्माते ए.एम.रत्नम यांच्याकडून विकत घेतले आहेत. त्यामुळे ‘नायक २’ मध्ये आता देशातील बदलेल्या राजकारणाबद्दल भाष्य केलं जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. (Nayak Movie Sequel)

बरं, ‘नायक’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांनी साऊथमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. आणि हिंदीतील नायक हा त्यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट होता जो हिट देखील झाला. शंकर यांनी ‘शिवाजी- द बॉस’, ‘आय’, ‘रोबोट 2.0’ (Robot 2.0) यांसारखे सुपरहिट चित्रपट तयार केले आहेत. त्यामुळे आता एस.शंकरच ‘नायक २’ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल. (Bollywood)
================================
हे देखील वाचा : शाहरुख खानमुळे ‘मुन्नाभाई ३’ अडकला? Arshad Warsi याने केला मोठा खुलासा
================================
आता जरा स्टारकास्टकडे वळूयात. चित्रपटात अनिल कपूर, राणी मुखर्जी, नीना कुळकर्णी, परेश रावल, शिवाजी साटम, जॉनी लिव्हर आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यापैकी मुळ खलनायक अमरीश पुरी यांचं निधन झाल्यामुळे आता त्यांची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बरं, तुम्हाला माहित आहे का? राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आणि अनिल कपूर यांनी त्यांच्य़ा अख्ख्या फिल्मी करिअरमध्ये फक्त नायक या एकाच चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आणि आत ‘नायक २’ मध्ये पुन्हा एकदा २५ वर्षांनी दोघं एकत्र दिसतील असा अंदाज आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi