Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Neena Gupta : जेव्हा ‘रिंकी की मम्मी’ विंडीजच्या ‘या’ महान क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती!
सध्या ‘पंचायत’ ही वेबसिरीज सगळीकडेच गाजतेय… यातल्या मेन character पैकी एक असलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांना आता आपण मंजू देवी म्हणूनच ओळखतो. याच नीता गुप्ता यांची ८०च्या दशकात पंचाईत झाली होती. तसं Single Parent ही संकल्पना कदाचित आता २१व्या शतकात आपण थोडी फार का होईना Accept केलीये… पण ७०-८०च्या दशकात एकट्या आईने बाळाला जन्म देणं आणि वाढवणं ते ही लग्नाशिवाय म्हणजे घोर पापच… अशाच परिस्थितीतून एका अभिनेत्रीने स्वत: सोबत आपल्या मुलीचंही करिअर घडवलं आणि तिला अभिमानाने इंडस्ट्रीत वावरण्याचा आत्मविश्वास दिला.. त्या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता…अभिनयाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये षटकार मारणाऱ्या नीना यांचं वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांच्यासोबतचं अफेअर फारच चर्चेत होतं… ८०च्या दशकात हॉट टॉपिक असणारं हे कपल नेमकं भेटलं तरी कुठे आणि त्यांच्या रिलेशनमधन जन्माला आलेल्या मसाबाची हटके गोष्ट आहे तरी काय जाणून घेऊयात…. (Bollywood Gossips)

बॉलिवूडमधल्या नीना गु्प्ता या Ahead of time असणाऱ्या अभिनेत्री होत्या… दिल्लीत लहानाच्या मोठ्या झालेल्या नीना यांनी संस्कृत विषयात पदवी घेतली, त्यानंतर एम.फील करत असताना नीना यांचं लक्ष अभ्यासापेक्षा सिनेमातच लागायला लागलं… अखेर National School of Dramaत १९७७ साली त्यांनी प्रवेश घेतला आणि आपलं स्वप्न पुर्ण करण्याचा नवा प्रवास सुरु केला… त्यावेळी NSD मध्ये भेटलेला एक मित्र पुढे त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सर्वात मोठ्या वादळात त्यांना मदत करेल असं कधी नीना यांना स्वप्नातही वाटलं नसावं.. कोण होता तो अभिनेता ते जाणून घेऊयातच पण त्या आधी जगाला हादरवून सोडणाऱ्या नीना आणि विव रिचर्ड्स यांच्या रिलेशनबद्दल आणि त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल जाणून घेऊयात…(Entertainment News)

नीना यांनी १९८२ मध्ये ‘साथ साथ’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली… विनोद खन्ना (Vinod Khanna) यांच्यासोबत एक चित्रपट त्या करत होत्या आणि त्याच्या शुटींगसाठी नीना जयपुरला गेल्या होत्या…त्यावेळी जयपूरच्या महाराणीने कलाकारांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं.. तेव्हा भारतात दौऱ्यावर असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या क्रिकेट टिमलाही राणीने आमंत्रण दिलं .. त्यावेळी टीमसोबत विवियन रिचर्डही तिथे आले होते..आणि तिच नीना आणि रिचर्ड यांची पहिली भेट होती… जयपूरमध्ये झालेल्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं.. खरं तर फार कमी काळ नीना आणि विवियन रिलेशनमध्ये होते.. दोघांनी एकमेकांच्या रिलेशनची कबूली दिली होती पण रिचर्डचं ऑलरेडी लग्न झालं असल्यामुळे त्याने नीना यांच्याशी लग्न केलं नाही… एका मुलाखतीमध्ये नीना यांनी सांगितलं होतं की,त्यांच्यात आणि विवियनमध्ये भावनिक गुंतागुंत नव्हती. ज्यावेळी दोघांचे अफेअर सुरु होते. त्यावेळी विवियन आपल्या पत्नीपासून विभक्त झाले होते. त्यांचा घटस्फोट व्हायचा होता. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं होती.(Neena Gupta And Viv Richards Affair)

नीना या रिचर्ड सोबतच्या अफेरमुळे प्रेगनंट झाल्या आणि त्यावेळी माध्यमांपासून लांब राहण्याचा पर्याय त्यांनी निवडला… त्याची बरीच कारणं होती, एक तर नीना स्वत: ‘गांधी’ चित्रपटात झळकल्यामुळे जगभरात फेमस झाल्या होत्या.. शिवाय लग्नाशिवाय जगातल्या बेस्ट क्रिकेटपटूचं मुल त्यांच्या पोटात होतं ज्याचा तो स्वीकार करत नव्हता… आता रिचर्डने नीना गुप्ता यांची Pregnancy Accept केली होती आणि नव्हती अशा दोन्ही गोष्टी बोलल्या जातात.. असो.. तर या विवादित रिलेशनशिपनंतर नीना यांनी १९८९ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव त्यांनी मसाबा (Masaba Gupta) असं ठेवलं… एका मुलाखतीमध्ये नीना यांनी सांगितलं होतं की, ज्यावेळी त्या Pregnant होत्या त्या फार टेन्शनमध्ये होत्या.. बराच काळ नीना यांनी स्वत:चं आणि विवियन यांचं करिअर संपू नये याचा विचार करत मीडीयापासून बाळाच्या वडिलांचं नाव लपवलं होतं… (Bollywood Affairs)

विवियन रिचर्ड मसाबाला तिची मुलगी म्हणून एक्सेप्ट करत नव्हते आणि त्यामुळे मुलीला वडिलांचं नावं कसं देणार? काय करणार? या विचारात असताना नीना गुप्ता यांना त्यांच्या NSDच्या मित्राने मदत केली होती.. तो मित्र म्हणजे दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik)… लग्नाशिवाय नीना आई होणार असल्यामुळे समाजाच्या बोचणाऱ्या नजरा आणि विचारांचा त्या सामना करत होत्याच.. अशा वेळी सतीश कौशिक यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली होती आणि म्हणाले होते की, “बाळाचा रंग काळा झालाच तर माझ्या रंगामुळे आपण म्हणून शकतो की हे माझंच मुल आहे…”. पण नीना यांनी आपल्या या चांगल्या मित्राची ती ऑफर नाकारली आणि एकटीनेच मसाबाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला…

नीना यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या हातातून बरीच कामं गेली.. चांगल्या चित्रपटांमधल्या भूमिका हुकल्या.. पण मुलीचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी छोट्या मोठ्या डेलिसोप्समध्ये भूमिका करत, लिखाण करत किंवा जाहिरातीत काम करत Financially स्वत:ला आणि मुलीला Settle केलं…बरं तुम्हाला आणखी एक गोष्ट माहितेय का त्यावेळी चक्क मसाबाचं बर्थसर्टिफिकेट माध्यमांमध्ये पब्लिश झालं होतं.. ९०च्या दशकातील Reporter प्रीतीश नंदी यांच्या हाती मसाबाच्या जन्मदाखल्याची प्रत पडली आणि नीना गुप्ता यांनी लपवून ठेवलेल्या मसाबाच्या वडलांचं नाव अखेर त्यांना समजलं. मसाबाचं बर्थसर्टिफिकेट’वीकली ऑफ इंडिया’ या मॅक्झिनमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं आणि जगाला मसाबा गुप्ता हिचे वडिल विव रिचर्ड आहेत हे समजलं…

नीना गु्प्ता आणि विव रिचर्ड यांच्या अफेरची बातमी कदाचित दोघांच्या चाहत्यांना पचण्यासारखी होती पण लग्नाशिवाय झालेलं मुल हे जरा पचणी पडत नव्हतं.. मात्र, जसा काळ पुढे गेला तसं लोकांनी आणि विव यांनी देखील मसाबाचा मुलगी म्हणून स्वीकार केला… मसाबाला तिच्या शाळा-कॉलेजमध्ये ती Love Child आहे असं म्हटलं जायचं… सारं काही ऑलवेल झालं.. नीना यांनी पुन्हा चित्रपटात कामं करण्यास सुरुवात केली, तर मसाबा फिल्म इंडस्ट्रीची टॉप फॅशन डिझायनर झाली… सध्या ‘पंचायत ४’ मुळे चर्चेत असणाऱ्या नीना गुप्ता Metro In Dino या चित्रपटात दिसणार आहेत.. याशिवाय आजवर नीना यांनी ‘खलनायक’, ‘त्रिकाल’, ‘बटवारा’, ‘स्वर्ग’, ‘बधाई हो’, ‘मुल्क’, ‘कागज २’ अशा बऱ्याच चित्रपटांत कामं केली आहेत.. राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या नीना गुप्ता आणि क्रिकेटविश्वातील लीजंड विवियन रिचर्ड यांची ही कॉम्प्लिकेटेड पण इंटरेस्टिंग लव्हस्टोरी कशी वाटली? (Neena Gupta Movies)
-रसिका शिंदे-पॉल