Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Amjad Khan यांच्या मध्यवर्ती भूमिकेतील ‘हा’ सिनेमा सुपर डुपर हिट

सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!

१५ ऑगस्ट ७५ ते सप्टेंबर ८०… तब्बल पाच वर्षे Sholay

Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

 Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर
Press Release

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

by रसिका शिंदे-पॉल 06/06/2025

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने २०२५ चे पुरस्कार जाहिर केले आहेत. रंगभूमीवर अविरतपणे काम करणाऱ्या कलावंतांचा गौरव केला जातो. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. (Entertainment)

मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकाविश्वात ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीनीना कुळकर्णी (Neena Kulkarni) सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्वाची भूमिका साकारत आहेत. नीना कुळकर्णी यांनी ‘मोगरा फुलला’, ‘बायोस्कोप’, ‘बादल’ हंगामा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. याशिवा, त्यांनी ‘ये हे मोहब्बतें’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. नीना कुळकर्णी यांनी १९८० मध्ये अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं. मात्र, मुलांच्या जन्मानंतर काही वर्षातच दिलीप यांचं निधन झालं. अशातच पतीच्या निधनानंतर नीना यांचं आयुष्य कसं बदललं आणि त्यानंतर पुन्हा अभिनयक्षेत्रात कायम काम करत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. (Marathi entertainment news)

आरपार या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी दोन मुलांना कसं वाढवलं आणि काम केलं हे सांगताना नीना म्हणाल्या की, “दिलीप हार्ट डिसीजने आजारी पडले आणि त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं. पण ते असतानाच माझ्या लक्षात आलं की, आता मला काम सिरियसली घ्यायला पाहिजे. ऑफर्स माझ्याकडे येत होत्या त्यामुळे चालून जायचं. दिलीप आणि माझ्यामध्ये,मला जास्त फॅन्सी गोष्टी घ्यायच्या असायच्या.दिलीप आजरी पडल्यानंतर माझ्या सगळं लक्षात आलं. मग जाहिराती आल्या. ते करत गेले. कारण आधी असं व्हायचं मला नाही एखादी भूमिका आवडली तर मी ती नाही करायचे. पण आता तसं नव्हतं. जोपर्यंत दिलीप गेले तोपर्यंत माझ्याकडे खूप काम नव्हतं आणि हिंदी चित्रपटात माझा जम बसत होता तेव्हा त्यांना कळलं की, She Lost Her Husband तेव्हा माझ्या दोन फिल्म्स गेल्या होत्या. की, आता ती कामच करणार नाही. गृहीतच धरतात ना! तिथे हे स्त्री-पुरुष जरा जास्त आहे, असं माझ्या तेव्हापासून लक्षात आलं, आणि पुढे मी जिद्दीने काम करतच राहिले”.(Bollywood)

================================

हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!

=================================

दरम्यान, नीना कुळकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘ध्यानीमनी’, ‘छापा-काटा’, ‘वाडा चिरेबंदी’ अशा दर्जेदार नाटकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. याशिवाय ‘सवत माझी लाडकी’, ‘आधारस्तंभ’, ‘उत्तरायण’ या मराठी चित्रपटातही उल्लेखनीय कामं केली आहेत. (Neena Kulkarni)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress neena kulkarni Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Entertainment Get Latest Marathi Entertainment update Marathi Movie marathi natya aprishad neena kulkarni
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.