Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

Neha Kakkar : ३ तास कॉन्सर्टला उशीरा पोहोचण्याचं दिलं स्पष्टीकरण
गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या कॉन्सर्टमला तीन तास उशीरा पोहोचल्यामुळे नेहाला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. उपस्थित लोकांनी नेहाला चांगलेच. खडे बोल सुनावत हे इंडिया नाही ऑस्ट्रेलिया आहे असं म्हणत निघून जा असं देखील म्हटलं. लोकांचा रोष पाहून नेहा चक्क स्टेजवरचं रडाला लागली. आता या सगळ्या रडगाण्यानंतर नेहाने ३ तास ती कॉन्सर्टला उशीरा का पोहोचली त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “मी कॉन्सर्टसाठी ३ तास उशिरा आले हे सगळ्यांनाच दिसत आहे. पण कोणीही एकदा तरी मला विचारलं का की माझ्यासोबत आणि माझ्या बँडसोबत नक्की काय काय घडलं होतं? मी स्टेजवर आल्यावर ऑडियन्सला काहीच सांगितलं नाही. कारण मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. मी कोण आहे एखाद्याला शिक्षा देणारी? पण आता माझं नाव खराब होतंय त्यामुळे मी बोलणारच”.
नेहा लिहिते, “मी ती कॉन्सर्ट मेलबर्नच्या ऑडियन्ससाठी अक्षरश: मोफत केली आहे. आयोजकांनी पैसे घेऊन पळ काढला. माझ्या बँडला ना खायला अन्न, ना राहायला हॉटेल आणि ना साधं पाणी मिळालं. माझे पती आणि इतर मुलं गेले आणि बँडसाठी गोष्टी पुरवल्या. असं सगळं असतानाही आम्ही स्टेजवर गेलो. थोडाही आराम न करता परफॉर्म केलं. कारण माझे चाहते तिथे कित्येक तास माझी वाट पाहत होते. कॉन्सर्टआधी साउंडचेकही करायला वेळ लागला. कारण साउंड व्हेंडरला पैसे मिळाले नसल्याने त्याने साउंड ऑन करायला नकार दिला. शेवटी कित्येक वेळानंतर ना मला लवकर पोहचता आलं ना साउंड चेक झालं. इतकंच नाही तर ही कॉन्सर्ट होणार आहे का याचीही शंकाच होती. आयोजक माझ्या मॅनेजरचे फोन उचलत नव्हते. अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे पण सध्या एवढं पुरे”.

“ज्या लोकांनी माझी बाजू घेतली त्यांचे खूप आभार. त्यांच्यासोबत घडल्यासारखंच त्यांनी मला पाठिंबा दिला. माझी परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले ते पाहून मी भारावून गेले. त्या दिवशी ज्यांनी माझी कॉन्सर्ट अटेंड केली, माझ्यासोबत रडले आणि दिलखुलास नाचले त्यांचेही मनापासून आभार. माझ्यासाठी कायम उभे राहिले माझ्यावर प्रेम केलंत त्याबद्दल खूप धन्यवाद.” (Entertainment masala)
==============
हे देखील वाचा :शाहरुख खानला हिंदी सिनेमात पहिला ब्रेक हेमामालिनीने दिला!
==============
आता नेहा कक्करच्या या स्पष्टीकरणानंतर लोकं तिला एक्सेप्ट करणार की यावरुनच तिला ट्रोल करणारे हे पाहावे लागले. पण सध्या नेहाच्या पोस्टमुळे मेलबर्न कॉन्सर्टचा राडा इथे संपला असं म्हणायला काही हरकत नाही. (Bollywood Taraka)