Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार;

Big Boss Marathi : पुणेकर दुपारी १ ते ४ का झोपतात? पुण्याच्याच अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा
‘कटप्पाने बाहुबली को क्यु मारा?’; या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे… आणि त्याच तोडीचा आणखी एक महत्वाचा प्रश्नम्हणजे ‘पुणेकर दुपारी १ ते ४ या वेळेत का झोपतात…?’. खरं तर यावर बरेच मीम्सही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत… आता मात्र, एका पुणेरी अभिनेत्रीनेच पुणेकरांच्या दुपारच्या झोपेबद्दल महत्वाचं विधान केलं आहे…
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील धाकड गर्ल नेहा शितोळे हिने नुकतीच आम्ही असं ऐकलंय या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती… यावेळी स्वत:च्या रागाबद्दल आणि झोपेबद्दल बोलताना पुणेकरांच्या दुपारच्या झोपेबद्दल तिने उत्तर दिलं आहे.. नेहा म्हणाली की, मला राग कंट्रोल होल नव्हता, सारखं रडू यायचं आणि ते कंट्रोल व्हावं म्हणून मी थेरपी घेत होते… त्यामुळे माझा राग कंट्रोल झाला… दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी खुप झोपते… जेव्हा मला भयंकर राग आलेला असतो किंवा खूप कसला तरी त्रास होत असतो रडू येत असंत आणि खूप काहीतरी आतमध्ये साठून आलेलं असतं तेव्हा दोन गोष्टी असतात… एक तर झोपल्यानंतर तुमची बॉडी शांत होते , श्वास शांत होतो आणि उठल्यानंतर बरेचदा काय होत होतं ते आठवतही नाही. आणि महत्वाचं म्हणजे पुणेकर आहे आणि पुणेकरांना झोप अत्यंत प्रिय आहे. आणि ती का आहे हे आता मला कळायला लागलंय. कारण पुणेकर ४ नंतर नव्या जोमाने कामाला लागतात.

आता नेहा शितोळे हिने म्हटल्याप्रमाणे पुणेकरांना जर का फार राग आला किंवा इतर काहीही गोष्टी घडल्या असतील तर ते दुपारी १ ते ४ या वेळेत आपली झोप पुर्ण करतात, रागावर नियंत्रण मिळवतात आणि पुन्हा जोमाने कामाला लागतात… अर्थात यात किती तथ्य आहे माहित नाही; पण किमान पुणेकरांच्या झोपेवर नेहाने केलेलं विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे…
================================
हे देखील वाचा: Priya Bapat-Umesh Kamat तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार!
=================================
नेहा शितोळे हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच तिने महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या देवमाणूस या चित्रपटाचं लिखाण केलं होतं… याशिवाय, सध्या नेहा पद्मश्री अशोक सराफ यांच्यासोबत कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा.मा या मालिकेत काम करत आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi