Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची पोस्ट!

 एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची पोस्ट!
टीव्ही वाले मिक्स मसाला

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची पोस्ट!

by रसिका शिंदे-पॉल 21/01/2026

मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये (Big Boss Marathi Season 6) रोज नवे नवे राडे पाहायला मिळत आहेत. राकेशने माझ्या परवानगीशिवाय माझा हात खेचला असा आरोप अनुश्रीने केल्यामुळे वाद विकोपालाच गेला. घरातील प्रत्येक सदस्य राकेशच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. तसेच, मुळात हा मुद्दा सुरु करणाऱ्या रुचितालाही (Ruchita Jamdar) घरच्यांनी चांगलंच झापलं. आता, महाराष्ट्रातील जनता देखील राकेशच्या मागे भक्कमपणे उभी असून त्याने तिला कुठल्याच चुकीच्या पद्धतीने हात लावला नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. राकेशच्या चाहत्यांनी #WeSupportRaqeshBapat हा हॅशटॅग ट्रेंड करत अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे. याशिवाय मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सुद्धा राकेशच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्या आहेत. (Raquesh Bapat)

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील उपविजेती नेहा शितोळेने सुद्धा पोस्ट शेअर करत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. नेहा शितोळेने लिहिलं आहे की, “राकेश बापट…याप्रकरणात मी तुझ्याबरोबर आहे, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. या मुली अतिशय वाईट पद्धतीने हा खेळ खेळत आहेत. एक स्त्री म्हणून मी तुझी माफी मागते…हे अजिबातच योग्य नाहीये. खरंच चुकीचं आहे! #We Support Raqesh Bapat…RB खरंच जेंटलमन आहे.” (Neha Shitole Social Media Post)

दरम्यान, झालं असं की, अनुश्री ज्या बेडवर झोपली होती त्यामुळे घरातील इतर सदस्यांना गैरसोय होत होती. त्यामुळे प्राजक्ता, तन्वी, राधा आणि राकेश बापट अनुश्रीला समजवायला गेले. तिने फक्त त्या बेडवरुन उठून दुसरीकडे झोपावं यासाठी सगळेच तिला समजावत होते. परंतु, तिने त्यांच्यावर उलटा आरडाओरडा करुन मला झोपेतून उठवू नका, मी एडजस्ट करणार नाही असं म्हटलं. त्यावेळी सगळेच तिथे उपस्थित असताना राकेशने तिचा हात धरुन फक्त तिला उठ अनुश्री दुसरीकडे झोप असं म्हटलं. यावरुनही तेहा तिने तु मला असं झोपेतून उठवू नको असं म्हटलं. शेवटी सदस्यांनी या अडचणीवर तोडगा काढला आणि ते प्रकरण तिथेच मिटलं. (Raquesh Bapat & Anushree Mane)

================================

हे देखील वाचा : अनुश्रीच्या परवानगीशिवाय तिच्या अंगाला हात लावला; रुचिकाने केला Raquesh Bapatवर गंभीर आरोप

================================

परंतु, दुसऱ्यादिवशी रुचिका आणि अनुश्री बसले असता अनुश्रीने राकेशने तिला असं हात धरुन उठवल्याचं तिला आवडलं नसल्याचं शेअर केलं. पण त्यानंतर उलटा-पुलटा टास्कदम्यान रुचिकाने राकेश-अनुश्रीचा तो मुद्दा उपस्थित करत वाद सुरु केला. कोणत्याही मुलीला तिच्या परवानगीशिवाय टच करु नये इतकं समजत नाही असा आरोप तिने राकेशवर केला. यावरुन घरातील सगळ्यांनाच तिचं हे विधान फार वेगळ्या पद्धतीने बाहेर जातंय असं वाटलं आणि त्यावरुन मोठा वाद सुरु झाला. आता शनिवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख या प्रकरणाबद्दल रुचिता आणि अनुश्रीची कानऊघाडणी करणार का हे पाहण्यासाठी सगळेच उस्तुक आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anushree mane big boss marathi season 6 Entertainment News Neha Shitole raquesh bapat ruchita jamdar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.