Kishore Kumar यांनी रेकोर्डिंग स्टुडिओत गाढव आणायला कां सांगितले?

ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे थेट स्वतःच आयलंड…
Bollywood Celebrity: भारतात सेलिब्रिटींचं उत्पन्न कोट्यवधींच्या घरात असतं, आणि म्हणूनच ते एक झगमगाट पूर्ण आणि ऐशोआरामाचं जीवन जगतात. चित्रपटसृष्टीतील कलाकार हे देशातील सर्वाधिक मानधन घेणारे लोक मानले जातात. त्यांची कमाई केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नसते.तर विविध कार्यक्रम, जाहिराती, पुरस्कार समारंभ, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. काही वेळा, या बाह्य कार्यक्रमांतून मिळणारी कमाई त्यांचं मूळ चित्रपट मानधनही मागे टाकते. यामुळेच हे कलाकार आलिशान जीवनशैलीत रममाण होतात. ब्रँडेड डिझायनर कपडे, राजवाड्यासारखी घरं, महागड्या गाड्या, आलिशान पार्टी आणि परदेशातल्या सुट्ट्या हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असतो. ज्याची स्वप्नं सामान्य माणूस फक्त बघत राहतो, ती स्वप्नं हे तारे प्रत्यक्षात जगतात. (Jacqueline Fernandez Private-Island)

काही सुपरस्टार्सकडे खासगी विमानं, आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्यांचा संग्रह असतो, पण आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने केवळ हेच नव्हे, तर स्वतःचं एक खासगी बेट देखील विकत घेतलं आहे! होय, ती अशी एकमेव अभिनेत्री आहे जिच्या नावावर एक खासगी बेट आहे. खरतर अशी गोष्ट स्वप्नातही विचारात येत नाही.पण हे खर आहे. तुम्हाला वाटत असेल की ही कोणीतरी ए-लिस्ट अभिनेत्री असेल, जसं की दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित किंवा ऐश्वर्या राय पण तर तसं नाहीये. ही अभिनेत्री म्हणजे सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली जॅकलीन फर्नांडिस आहे.

जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक काळापासूनभारतीय सिनेसृष्टीत सक्रिय आहे. ती अशी एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने खासगी बेट विकत घेतलं आहे. हे बेट श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ आहे आणि सुमारे चार एकर क्षेत्रफळाचं आहे. 2012 साली तिने हे बेट सुमारे $600,000 म्हणजेच तेव्हा सुमारे ₹3 कोटी मध्ये विकत घेतले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जॅकलीन या बेटावर एक आलिशान व्हिला बांधण्याची योजना करत होती. मात्र, हा व्हिला तिच्या वैयक्तिक वापरासाठी होता की व्यवसायिक उपयोगासाठी याबाबत तिने कधीच अधिकृतपणे खुलासा केला नाही. तसेच, सध्या ती या बेटाचा काय उपयोग करत आहे, याबाबतही कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही.
============================
============================
श्रीलंकेची माजी सौंदर्यवती जॅकलीनने मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात केली आणि 2009 मध्ये ‘अलादीन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, 2011 साली आलेल्या ‘मर्डर 2′ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर ‘हाउसफुल 2’, ‘रेस 2’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत ती झळकली. काही वर्षांनी मात्र तिच्या अनेक चित्रपटांनी अपेक्षित यश मिळवलं नाही. 2025 साली तिचे दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यात ‘हाउसफुल 5’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ यांचा समावेश आहे आणि हे दोन्ही चित्रपटांत तिच्यासोबत अक्षय कुमार झळकणार आहे.