Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Netflix : भारताकडून नेटफ्लिक्सला गेल्या ४ वर्षांत ‘इतक्या’ कोटींचा झाला नफा!

 Netflix : भारताकडून नेटफ्लिक्सला गेल्या ४ वर्षांत ‘इतक्या’ कोटींचा झाला नफा!
मिक्स मसाला

Netflix : भारताकडून नेटफ्लिक्सला गेल्या ४ वर्षांत ‘इतक्या’ कोटींचा झाला नफा!

by रसिका शिंदे-पॉल 05/05/2025

मनोरंजनाचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे नेटफ्लिक्स (Netflix). जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील आणि वेगवेगळ्या आशयांचा कंटेन्ट घरबसल्या सहज पाहता येतो. नव्या चित्रपट किंवा वेब सीरीजसोबतच काही जुने गाजलेले चित्रपटही नेटफ्लिक्सवर पाहता येतात. दरम्यान, जगभरातील प्रेक्षक जरी आवर्जून नेटफ्लिक्स पाहात असले तरी भारतीय प्रेक्षकांचा या यादीत वरचा क्रमांक नक्कीच लागतो. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजनंतर अनेकांनी नेटफ्लिक्सला विशेष पसंती दाखवली. नुकताच भारतातून नेटफ्ल्किसला किती कोटींचा नफा झाला आहे याची माहिती नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस यांनी दिली आहे. (Netflix co-CEO Ted Sarandos)

मुंबईत नुकत्याच संपन्न झालेल्या ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves Summit 2025) मध्ये नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस सहभागी झाले होते. यावेळी एका परिषदेत अभिनेता सैफ अली खान याने टेड सारंडोस यांच्याशी संवाद साधला. या संभाषणात भारतातील नेटफ्लिक्सच्या नफ्याबद्दल सारंडोस यांनी खुलासा केला. २०२१ ते २०२४ या कालावधीत नेटफ्लिक्सने भारतातून जवळपास २०० कोटी डॉलर्स (१६,००० कोटी रुपये) इतका नफा कमावला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Netflix ott platform)

सारंडोस यांनी सांगितलं की,”या यशाचा थेट फायदा भारतीय निर्मिती संस्थांना आणि तंत्रज्ञ वर्गाला झाला असून आतापर्यंत १५० पेक्षा जास्त भारतीय वेबसीरिज आणि चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. ९० हून अधिक शहरांमध्ये या कलाकृतींचं चित्रीकरण झालं असून या माध्यमातून जवळपास २० हजारांहून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत”. (Bollywood news)

===============================

हे देखील वाचा:   YouTube : नेटफ्लिक्स अन् प्राइमशी स्पर्धा करण्यासाठी YouTubeचा नवा अवतार येणार

===============================

सारंडोस यांनी अधिक माहिती देत म्हटले की, “नेटफ्लिक्सवर गेल्या वर्षी जगभरातील प्रेक्षकांनी ३ अब्ज तासांहून अधिक भारतीय कंटेन्ट पाहिला आहे. तसेच, दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या टॉप १० वेबमालिकांमध्ये एक तरी भारतीय सीरिज असतेच”.  भारतीय मेकर्सने त्यांच्या मातीतील कथा किंवा आपल्या संस्कृतीशी निघडित असणाऱ्या गोष्टींवर अधिक भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तर ‘सेक्रेड गेम्स’पासून सुरू झालेला प्रवास आज नेटफ्लिक्ससाठी केवळ यशाचाच नव्हे, तर भारतीय मनोरंजनसृष्टीला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा अभिमानाचा क्षणही ठरला आहे. (Entertainment trending news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood movies 2025 Netflix Netflix co-CEO Ted Sarandos netflix india ott platforms Saif Ali Khan waves summit waves summit 2025 Web series
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.