
Netflix : भारताकडून नेटफ्लिक्सला गेल्या ४ वर्षांत ‘इतक्या’ कोटींचा झाला नफा!
मनोरंजनाचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे नेटफ्लिक्स (Netflix). जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील आणि वेगवेगळ्या आशयांचा कंटेन्ट घरबसल्या सहज पाहता येतो. नव्या चित्रपट किंवा वेब सीरीजसोबतच काही जुने गाजलेले चित्रपटही नेटफ्लिक्सवर पाहता येतात. दरम्यान, जगभरातील प्रेक्षक जरी आवर्जून नेटफ्लिक्स पाहात असले तरी भारतीय प्रेक्षकांचा या यादीत वरचा क्रमांक नक्कीच लागतो. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजनंतर अनेकांनी नेटफ्लिक्सला विशेष पसंती दाखवली. नुकताच भारतातून नेटफ्ल्किसला किती कोटींचा नफा झाला आहे याची माहिती नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस यांनी दिली आहे. (Netflix co-CEO Ted Sarandos)

मुंबईत नुकत्याच संपन्न झालेल्या ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves Summit 2025) मध्ये नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस सहभागी झाले होते. यावेळी एका परिषदेत अभिनेता सैफ अली खान याने टेड सारंडोस यांच्याशी संवाद साधला. या संभाषणात भारतातील नेटफ्लिक्सच्या नफ्याबद्दल सारंडोस यांनी खुलासा केला. २०२१ ते २०२४ या कालावधीत नेटफ्लिक्सने भारतातून जवळपास २०० कोटी डॉलर्स (१६,००० कोटी रुपये) इतका नफा कमावला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Netflix ott platform)

सारंडोस यांनी सांगितलं की,”या यशाचा थेट फायदा भारतीय निर्मिती संस्थांना आणि तंत्रज्ञ वर्गाला झाला असून आतापर्यंत १५० पेक्षा जास्त भारतीय वेबसीरिज आणि चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. ९० हून अधिक शहरांमध्ये या कलाकृतींचं चित्रीकरण झालं असून या माध्यमातून जवळपास २० हजारांहून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत”. (Bollywood news)
===============================
हे देखील वाचा: YouTube : नेटफ्लिक्स अन् प्राइमशी स्पर्धा करण्यासाठी YouTubeचा नवा अवतार येणार
===============================
सारंडोस यांनी अधिक माहिती देत म्हटले की, “नेटफ्लिक्सवर गेल्या वर्षी जगभरातील प्रेक्षकांनी ३ अब्ज तासांहून अधिक भारतीय कंटेन्ट पाहिला आहे. तसेच, दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या टॉप १० वेबमालिकांमध्ये एक तरी भारतीय सीरिज असतेच”. भारतीय मेकर्सने त्यांच्या मातीतील कथा किंवा आपल्या संस्कृतीशी निघडित असणाऱ्या गोष्टींवर अधिक भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तर ‘सेक्रेड गेम्स’पासून सुरू झालेला प्रवास आज नेटफ्लिक्ससाठी केवळ यशाचाच नव्हे, तर भारतीय मनोरंजनसृष्टीला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा अभिमानाचा क्षणही ठरला आहे. (Entertainment trending news)