Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !

Marathi Movie Remakes : मराठी भाषेतील चित्रपटांची बॉलिवूड आणि साऊथला

‘या’ सिनेमात पहिल्यांदा मोहम्मद रफी यांनी Rishi Kapoor यांच्यासाठी पार्श्वगायन

Thappa : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Almost Comedy Teaser: हास्याची नवी लहर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर प्रदर्शित

 Almost Comedy Teaser: हास्याची नवी लहर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर प्रदर्शित
Almost Comedy Teaser
टीव्ही वाले मिक्स मसाला

Almost Comedy Teaser: हास्याची नवी लहर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 19/01/2025

Almost Comedy Teaser: काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या शो विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.(Allmost Comedy Teaser)

Almost Comedy Teaser
Almost Comedy Teaser

‘ऑलमोस्ट कॉमेडी’मध्ये, लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक, प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे, आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. आपल्या दिलखेच अंदाजात सूत्रसंचलन करून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या शोची रंगत वाढवणार!(Almost Comedy Teaser)

==============================

हे देखील वाचा: Fussclass Dabhade Movie Song:प्रत्येक मनाला करत आनंद देणारं फसक्लास प्रेमगीत ‘मनाला लायटिंग’ प्रेक्षकांच्या भेटीस!

==============================

पाच लेखकांचे पाच एपिसोड्स रसिकवर्गाला पाहायला मिळणार असून येत्या २४ जानेवारीला ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा पहिला एपिसोड एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी नवीन एपिसोड प्रदर्शित होईल. या पाच एपिसोड्स व्यतिरिक्त एक एपिसोड नक्कीचं खास ठरेल, कारण प्रियदर्शनी इंदलकर सुत्रसंचलनाबरोबर लेखकांना रोस्ट देखील करणार आहे. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रोस्टिंगचे अनकट सीन पाहायला मिळणार आहेत. आता आठवड्याचा प्रत्येक शुक्रवार हा प्रेक्षकांसाठी हास्याचा खास दिवस ठरेल यात शंकाच नाही.

Almost Comedy Teaser
Almost Comedy Teaser

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली,”  मला जेव्हा अमोलचा फोन आला की, आम्ही एक शो करतोय आणि तुला या शोचे होस्टिंग करत या लेखकांना रोस्ट करायचे आहे. मी खूप आश्चर्यचकित झाले, इतके मोठे, अनुभवी कलाकार असूनही त्यांनी मला फोन केला. मी याला एक चांगली संधीच म्हणेन. कारण या आधी मी कधी अशा प्रकारचे काम केले नाही. स्टँडअप हा प्रकार मला ट्राय करायचा होता आणि या शोच्या निमित्ताने मला याचा अनुभव घेता आला. सगळ्यांनी मला या प्रवासात खूप सांभाळून घेतले. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि संजय छाब्रिया यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ही संधी दिली. आता हा आमचा प्रवास अजून लांबपर्यंत चालणार असून अजून जास्त लोकांपर्यंत हे आम्ही पोहोचवणार आहोत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Allmost Comedy Teaser Almost Comedy Teaser Celebrity hasyajatra actress marathi Comedy show marathi stand up comedy show priydarshini indalkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.