
Raj Thackeray : ‘त्या’ रात्री निलेश साबळेला राज ठाकरेंचे १७ मिसकॉल्स का आले होते?
१०-१२ वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम नव्या रुपात पुन्हा एकदा भेटायला येणार आहे… महत्वाचं म्हणजे यात सुत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sabale) नसून अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) असणार आहे… या चला हवा येऊ द्या कार्यक्रमावरुन मध्यंतरी निलेश साबळे आणि शरद उपाध्ये यांच्यात वाद झाला होता… बरं निलेश पहिल्यांदात अशा वादात सापडला नाही आहे तर या आधीही तो वादात सापडला असून एकदा तर त्याचा सामना थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी झाला होता.. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात…

तर, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आणि बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये निलेश साबळेनं अनेक राजकीय नेत्यांच्या नकला केल्या होत्या. एकदा त्याने राज ठाकरे यांची केलेली नक्कल चांगलीच व्हायरल झाली होती.. तो भाग प्रसारित झाल्यानंतर निलेशला थेट राज ठाकरेंचा फोन गेला होता. तो किस्सा सांगताना निलेश म्हणाला की, “मी अनेक कार्यक्रमांमध्ये राज साहेबांची नक्कल करायचो. एके दिवशी शूटिंग संपल्यानंतर मी घरी आलो आणि झोपलो. माझा फोन सायलेंट मोडवर होता. उठल्यानंतर पाहिलं तर त्यावर अनेक मिस्डकॉल्स आले होते. १-२ नाही तर चक्क १७ मिस्डकॉल होते. आजही माझ्याकडे त्याचा स्क्रिनशॉर्ट आहे”.

पुढे निलेश म्हणाला की, “मला आधी कळालंच नाही की हा नंबर कोणाचा आहे. एका नंबरवरून फोन आला, त्यांनी विचारलं की, झोपलाय का? नंतर फोन करू? त्यांना विचारलं की, आपण कोण बोलताय? यावर ते म्हणाले राज ठाकरे बोलतोय. काही क्षण मला वाटलं की, राज साहेब मला का फोन करतील? कोणी तरी माझी मजा घेतंय असं मला वाटलं. ते समोरून परत म्हणाले की, अमेय खोपकरांनी मला तुमचा एक व्हिडिओ दाखवला. त्यांनी जेव्हा अमेय खोपकरांचं नाव घेतलं तेव्हा मी थोडा अलर्ट झालो. तेव्हा मला खरं वाटलं की, हो हा राज ठाकरेंचाच फोन आहे”.
================================
हे देखील वाचा : Raj Thackeray : मराठी कलाकारांसमोर राज ठाकरे यांनी ए.आर.रेहमान यांचं केलं कौतुक!
=================================
राज ठाकरे पुढे फोनवर निलेशला म्हणाले, “तुम्ही उशिरा शूटिंग करून आला आहेत, झोपा..झोप झाली की फोन करा. मी म्हणालो नाही साहेब बोला तुम्ही. तेव्हा ते म्हणाले की, तुमचा कार्यक्रम आवडतो मला. मला तुमच्या टीमला भेटायचं आहे. त्या फोननंतर दोनच दिवसांत चला हवा येऊ द्याची संपूर्ण टीम राज ठाकरेंच्या घरी गेली होती. सगळं बाजूला ठेऊन त्यांनी दोन तास आमच्यासोबत गप्पा मारल्या”. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय वातावरणात निलेश साबळे याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवाय, नवं चला हवा येऊ द्या कसं असणार? याकडेही प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
================================
हे देखील वाचा : Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल मौन सोडलं!
=================================