Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Chala Hava Yeu Dya: अखेर निलेश साबळेने सांगितले ‘चला हवा येऊ द्या’ सोडून देण्याचे खरे कारण…
Chala Hava Yeu Dya: डॉ. निलेश साबळे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात आपली खास ओळख निर्माण केली. तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत राहिला आणि त्याने मनोरंजनाचा एक वेगळा इतिहास घडविला. मात्र काही काळापूर्वी या कार्यक्रमाचे प्रसारण थांबल्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची जोडी कलर्स मराठीवर येऊन ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये दिसली. मात्र, या नव्या कार्यक्रमात काही तितकीशी नवीनीकरण नसल्यामुळे चाहत्यांकडून तो ट्रोल होऊ लागला आणि अखेर दोन महिन्यांतच हा शो बंद करावा लागला.(Nilesh Sable On Chala Hava Yeu Dya)

अलीकडेच निलेश साबळे यांनी एका मुलाखतीत ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडण्यामागील कारण आणि दुसऱ्या वाहिनीवर जाण्याबाबत खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, “हा निर्णय संपूर्णपणे चॅनलचा होता. झी मराठीशी माझा खूप जुना आणि चांगला संबंध आहे. मी तिथे अनेक वर्ष काम केलं आहे आणि त्यांना मी कायमच ऋणी आहे. प्रत्येक शोचा शेवट हा चॅनल ठरवतो आणि त्या वेळी त्यांना वाटलं की हा कार्यक्रम थोडक्याच काळासाठी थांबायला हवा. त्यांना असं वाटणं बरोबरही असू शकतं. अशावेळी सगळ्यांनी थोडा वेळ शांत बसून पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा, पण त्याने ठरवलेला गॅप फार मोठा होता.”

ते पुढे म्हणाले की , “आमच्या टीम आणि चॅनलमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान चर्चा झाली होती. त्यांनी सांगितले की हा शो पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये परत येईल, म्हणजे तब्बल आठ-नऊ महिन्यांनंतर. मला कलाकार म्हणून तो काळ खूप जास्त वाटत होता. आजकाल सोशल मिडीयाच्या युगात जर तुम्ही 15-20 दिवस लोकांना दिसत नाहीत तर लगेच लोक तुमचं विसरतात. त्यामुळे इतका मोठा अंतराल प्रेक्षकांपासून वेगळेपणा वाढवू शकतो. तसेच, त्या काळात जर आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये न दिसलो तर टीमही विखुरली जाते. प्रेक्षकांनी जी अपेक्षा ठेऊन ठेवलेली असते तीही तोडली जाते आणि लोक म्हणतात की जर ते येणार नाहीत तरी चालेल.”
=================================
हे देखील वाचा: Mrunmayee Deshpande: ६ अभिनेत्यांसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार!
==================================
निलेश यांनी सांगितले की, “आजही जे लोक आम्हाला भेटायला येतात ते नेहमी विचारतात ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा कधी सुरू होणार? काही वेळा शो सुरूही झाला, पण लोकांपर्यंत माहिती पोहोचली नाही. त्यामुळे लोकांना कळत नव्हतं की शो चालू आहे की नाही. मला वाटतं लोकांना हा शो पाहायचा आहे कारण कुणीही मला किंवा भाऊंना ‘हा शो बंद करा’ असं कधी सांगितलं नाही. मात्र ट्रोलर्स काहीही म्हणतात ते त्यांचा हक्क आहे. पण जे लोक भेटतात, ते जे तोंडावर बोलतात तेच खरी तारीफ असते.” “कार्यक्रम थोडक्याच काळासाठी गॅपवर असताना मी बाहेर पडले आणि त्यानंतरच मला कॉल आला की परत यायचं का? मी होकार दिला आणि त्यानंतर कलर्स मराठीवर ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा शो सुरू झाला,” असेही निलेशने स्पष्ट केले.