Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

 नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 
Nirmiti Sawant as Sasu
मिक्स मसाला

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

by Team KalakrutiMedia 10/02/2026

मराठी टेलिव्हिजनवरून घराघरात पोहोचलेली ‘गंगुबाई’ म्हणजेच अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant). गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी घट्ट नातं जोडले आहे. संवेदनशील शिक्षिकेपासून ते ठाम आणि प्रभावी स्त्री व्यक्तिरेखांपर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम लक्षात राहिल्या आहेत. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) या चित्रपटात त्यांनी साकारलेली शिक्षिकेची भूमिका असो वा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई?’ (Aga Aga Sunbai, Kay Mhanta Sasubai?) मधील हटके सासू प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील त्यांची सासू पारंपरिक चौकटीत अडकलेली नसून प्रेक्षकांना वेगळीच भासली.(Nirmiti Sawant)

Nirmiti Sawant in Super Duper
Nirmiti Sawant As Sasu

आता पुन्हा एकदा निर्मिती सावंत सासूच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत, पण यावेळी अवतार आणखीच भन्नाट आहे. त्यांचा आगामी सिनेमा ‘सुपर डुपर’ (Super Duper) सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातून संपूर्ण टीमची झलक पाहायला मिळते. या सिनेमात मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांची फौज आहे. निर्मिती सावंत यांच्यासोबत शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि मुख्य भूमिकेत ललित प्रभाकर ( Lalit Prabhakar) व विदुला चौगुले (Vidula  Chougule  ) झळकणार आहेत. टीझरमध्ये निर्मिती सावंत नऊवारी साडी, नथ, काळा चष्मा आणि हातात बंदूक अशा पूर्णपणे डॅशिंग लुकमध्ये दिसतात, तर शेवटी ललित प्रभाकरची कडक एन्ट्री लक्ष वेधून घेते.

Nirmiti Sawant in Super Duper
Nirmiti Sawant As Sasu

‘कौटुंबिक महासोहळा’ अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचा उत्सव साजरा करणारा आहे. आपल्या संस्कृतीत कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हीच भावना या सिनेमातून मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील (Samir Asha Patil)  यांच्या मते, माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत कुटुंबाची भूमिका फार मोलाची असते. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपलासा वाटेल असा अनुभव ‘सुपर डुपर’ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Nirmiti Sawant)

=============================

हे देखील वाचा: Uttar Movie OTT: रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा उत्तर आता घरबसल्या पाहता येणार; पाहा कधी आणि कुठे होणार प्रदर्शित! 

=============================

3 एप्रिल 2026 रोजी हा धमाकेदार कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यावेळी कुटुंबाची गोष्ट थोड्या वेगळ्या, अधिक मसालेदार आणि मनोरंजक अंदाजात पाहायला मिळणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Lalit Prabhakar Marathi cinema news Marathi family film Marathi Movie nirmiti sawant Nirmiti Sawant saas role Super Duper Marathi movie Super Duper teaser Vidula Chougule
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.