Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Nivedita Saraf : “एकाच दिवशी एवढे चित्रपट रिलीज करणं मला चुकीचं वाटतं!”
थिएटर्समध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचा बोलबाला सुरु झाला आहे… प्रेक्षक पुन्हा एकदा मराठी चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्सकडे वळले आहेत… नुकतेच एकाच दिवशी ३ मराठी चित्रपट रिलीज झाले… सगळ्यांनी जरी प्रेक्षकांचं कौतुक केलं असलं तरी काही जणांनी एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट रिलीज होणं योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत… अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी देखील याबद्दल बोलताना, “एकाच दिवशी जास्त मराठी चित्रपट रिलीज होणं ही चुक”, असं म्हटलं आहे…(Marathi Entertainment News)

१२ सप्टेंबर २०२५ रोजी ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि स्वत: निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ असे ३ चित्रपट रिलीज झाले होते… याबद्दल नवशक्तीसोबत बोलताना निवेदिता म्हणाल्या की,”आता आपण एकाच दिवशी ८ – ९ मराठी सिनेमे रिलीज होताना बघतोय. प्रिया (प्रिया बापट) म्हणाली होती की, रविवारी पुण्यात नाटकाचे सहा प्रयोग होते. सहाही प्रयोग हाउसफुल्ल. लोकं नाटकासाठी बाहेर पडत आहेत, त्यामुळे चित्रपटांसाठीही त्यांनी बाहेर पडावं. आणि म्हणूनच एकाच दिवशी एवढे चित्रपट रिलीज होणं मला वैयक्तिकरित्या चुकीचं वाटतं. ऑलरेडी सध्या पिक्चर चालत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही पर्सनली एकमेकांशी बोललं पाहिजे. आपण निर्माते म्हणून एकत्र नाही आहोत. जे एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.”
================================
हे देखील वाचा : Dashavatar Film : कोकणातील ‘दशावतार’ बॉक्स ऑफिसवर गाजला…
=================================
दरम्यान, निवेदिता सराफ यापूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात झळकल्या होत्या… शिवाय, नुकतीच त्यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेने निरोप घेतला… आता बिन लग्नाची गोष्ट चित्रपटानंतर आगामी त्यांचा कोणता चित्रपट येणार याची चाहते नक्कीच वाट पाहात आहेत…(Nivedita Saraf movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi