दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!
अभिनेत्री नर्गीस एक परीपूर्ण स्त्रीचं आयुष्य जगली. तिने आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटनेला/प्रसंगाला आणि व्यक्तीला अतिशय मनापासून प्रामाणिकपणे साथ दिली. राजसोबतचं प्रकरण संपल्यावर तिने आयुष्यातून तो एपिसोड डिलीट करून टाकला.
’आग’(१९४८) च्या निमित्ताने तिच्या जीवनात राज आला आणि सुनील दत्त तिच्या जीवनात येण्याकरीता देखील कारणीभूत ठरली ती ’मदर इंडीया’च्या सेटवर लागलेली ’आग’चं! गुजरात मध्ये सिनेमाचे शूट चालू होतं. सिनेमात नर्गीस सुनील दत्तच्या आईची भूमिका करत होता. एका दृष्यात शेतीला आग लागते, असा शॉट चित्रित होत होता. त्या वेळी काही डुप्लीकेट वापरले नव्हते कारण हे दृष्य एवढं प्राणघातक होईल असं दिग्दर्शक मेहबूब व सिनेमाचे कोरीओग्राफर फरदून इराणीला वाटलंच नाही. पण अचानक वार्याची दिशा बदलली व आगीचा लोळ अचानक पसरला.
हे वाचलेत का ? सुनिये..जरा अपने डॉयलॉग ठिक तरहसे याद करके लिजिएगा!
नर्गीसला आगीच्या ज्वाळांनी वेढून टाकल्यावर सुनीलने आपल्या जीवाची पर्वा न करता सरळ आगीत झेप घेतली.
नर्गीसला वाचवताना सुनील गंभीर जखमी झाला. हॉस्पिटल मध्ये त्यांच्यातील प्रेमभावनेला अंकुर फुटले. सुनीलच्या साध्या सरळ निरपेक्ष स्वभावाने नर्गीसच्या दिलात घर केले. त्यांच प्रेमात पडणं त्यांना देखील अनपेक्षित होत! कारण मदर इंडीयाच्या वेळी नर्गीस टॉपची अभिनेत्री होती, तर सुनील अजून यशाच्या प्रतिक्षेत होता. ११ मार्च १९५८ रोजी ती दोघे विवाहाच्या बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सिनेमाच्या यशावर विपरीत परीणाम होईल म्हणून त्यांनी हि बातमी गुप्त ठेवली. २५ ऑक्टोबर १९५८ च्या दिवाळीत सिनेमा प्रदर्शित झाला. या दोघांच लग्न फार काळ टिकणार नाही असं सर्व जण म्हणत असताना हे लग्न नुसतं टिकलंच नाही तर यशस्वी झालं. सुनीलच्या आयुष्याला आकार मिळाला.
हे वाचलेच पाहिजे : ‘मदर इंडिया’ नावाची अनटोल्ड स्टोरी
एक गंमत म्हणजे सुनील सिनेमात येण्यापूर्वी रेडिओ सिलोनवर निवेदक होता. त्या वेळी तो सिने कलावंताच्या मुलाखती घ्यायचा. नर्गीस तशी मिडिया पासून चार हात दूरच असायची. आपल्या या कार्यक्रमात तिने यावे असे त्याला कायम वाटायचे. बर्याच मिन्नतवार्या करून ती मुलाखतीला तयार झाली. पण एवढी मोठी कलावंत अभिनेत्री तिची मुलाखत घेताना सुनीलला दडपण आलं. तो चक्क घाबरला होता. तो खूप नर्व्हस झाला. पण तिने त्याला तिथेही धीर दिला व मुलाखत छान रंगली! दोघांनाही कल्पना नव्हती काही वर्षांनी ते एकमेकाचे जीवन साथी बनणार आहेत!!