Susheela-Sujeet : बाल्कनीमधून ‘सुशीला-सुजीत’ का ओरडत आहेत हे लवकरच कळणार!

एकेकाळी होते नक्षलवादी नंतर बनले भारताचे ‘Disco Dancer’
काळ 1984 चा. रशियातलं एक थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं, तरी लोकं स्वत:च्या घरातून खुर्च्या घेऊन थिएटरमध्ये चित्रपट बघायला येत होते. लोकांची ही गर्दी कोणत्या रशियन मूवीसाठी नाही तर एका भारतीय चित्रपटासाठी होत होती. हा चित्रपट होता डिस्को डान्सर, जो १०० कोटी कमवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. या चित्रपटाचे लीड हीरो होते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), ज्यांच्या स्टाइलने आणि डान्सने भारतापासून रशियापर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली. बॉलीवुड सुपरस्टार असणारे मिथुन चक्रवर्ती एकेकाळी नक्षलवादी होते. मग ते चित्रपटांमध्ये कसे आले ? आणि रशियापर्यंत हिट कसे झाले?

गौरांग चक्रवर्ती म्हणजेच मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा जन्म १६ जून १९५२ला कोलकाताला एका बंगाली हिंदू फॅमिलीमध्ये झाला. आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी film and television institute of india म्हणजेच ftii मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. पण चित्रपटसृष्टीत येण्याआधी काही काळासाठी ते नक्षलवाध्यांशी जोडले गेले होते, जे त्यांच्या घरच्यांना अजिबात आवडलं नव्हतं. कारण नक्षलवादी होणं हा वन-वे रोड असतो, असं बोललं जातं. पण जेव्हा त्यांच्या भावाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला, तेव्हा त्यांना कुटुंबापासून लांब राहणं अवघड जातं होतं. कुटुंबाची जबाबदारी उचल्याण्यासाठी त्यांनी नक्षलवाद्यांची साथ सोडली आणि मग पुन्हा ते त्या वाटेकडे फिरकले नाही.

प्रत्येक आउटसाईडर सारखाच त्यांना सुद्धा चित्रपटात काम मिळवण्यासाठी struggle करावा लागला. तेव्हा struggling काळात त्यांनी डान्सिंग डीवा हेलन यांना असिस्ट केलं होतं. त्यांचा अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या पहिल्याच ‘मृगया‘ या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अॅक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. हा चित्रपट १९७६ साली आला होता. १९७६ ते १९८१ त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. मग १९८२ साली त्यांचा ‘डिस्को डान्सर‘ हा चित्रपट आला आणि त्यांचं नाव जगभरात पोहचलं. संपूर्ण आशिया आणि रशियामध्ये त्यांचा डिस्को डान्सर पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होऊ लागली.
भारतात जरी हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला असला, तरी इतर देशांमध्ये तो दोन वर्षांनी म्हणजेच १९८४ साली प्रदर्शित झाला. जगभरात हा चित्रपट इतका चालला की, त्याकाळात त्याने १०० कोटींचा गल्ला केला. तेव्हा एक महिन्यापूर्वीच मायकल जॅकसन यांचा एक अल्बम हिट झाला होता आणि त्याच्या एक महिन्यांनंतर त्यांचा हा मूवी प्रदर्शित झाला. त्यांच्या स्टाइल आणि unique डान्समुळे त्यांना इंडियन माइकल जॅकसन सुद्धा बोललं जाऊ लागलं. (Mithun Chakraborty)

रशियामध्ये त्यांची क्रेझ इतकी होती की, त्यांची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर लोकांनी गर्दी केली होती. ज्यामुळे तत्कालीन प्रधानमंत्री यांची निघणारी एक रॅली कॅन्सल कारावी लागली होती. मिथुन दा यांच्या डिस्को डान्सरने इतिहास घडवला. इंटरेस्टिंग म्हणजे या चित्रपटात मिथुन (Mithun Chakraborty) दा सोबत काम करण्यासाठी इंडस्ट्रीमधील बऱ्याच अॅक्ट्रेसेसने नकार दिला होता. पुढे त्यांनी अनेक चित्रपट केले.
==============
हे देखील वाचा : प्रेग्नंसीच्या प्रवासाची गंमतीशीर गोष्ट म्हणजे ‘एक दोन तीन चार’ !
==============
पण १९९३ ते १९९८ हा काळ त्यांच्यासाठी कठीण होता. या काळात त्यांचे लगातार ३३ चित्रपट फ्लॉप झाले. तरी दमदार अभिनयामुळे त्यांना चित्रपट मिळत राहिले. एका वर्षात सर्वाधिक चित्रपटांमध्ये लीड रोलमध्ये काम करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. ३५० हून अधिक आणि ८ पेक्षा जास्त भाषांच्या चित्रपटांमध्ये कामकरणाऱ्या या हरहुन्नरी कलाकार (Mithun Chakraborty)ला नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.