‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Onkar Bhojane ची घर वापसी; ‘या’ दिवसापासून पुन्हा दिसणार हास्यजत्रेत…
‘Maharashtrachi Hasyajtra’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात लग्नमंडपात रागावणारा मामा, तर कधी ‘अगं अगं आई’ म्हणत निरागस चेहरा करणारा मुलगा या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं होतं. आणि आता पुन्हा एकदा हसण्याचा झंकार रंगणार आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कलाकाराचा म्हणजेच अभिनेता ओंकार भोजनेचा (Onkar Bhojne) भव्य पुनरागमन होतोय. ‘कोकण कोहिनूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओंकारने काही काळ कार्यक्रमाला विश्रांती दिली होती. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत चाहत्यांना त्याची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. अखेर चाहत्यांची ही आतुरतेने वाट पाहिलेली इच्छा पूर्ण होत असून, ओंकार लवकरच पुन्हा हास्यजत्रेच्या मंचावर धमाल उडवणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी ही एक भन्नाट भेट ठरणार आहे.(Onkar Bhojane Hasyajatra)

ओंकारने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत तो नवसंजीवनी आणायचा. त्याची अभिनयशैली, संवादफेक आणि वेळ साधण्याचं अचूक कौशल्य यामुळे प्रत्येक स्किट गाजायचं. पाहुणे कलाकारसुद्धा त्याच्या प्रतिभेचं कौतुक केल्याशिवाय राहू शकत नव्हते. ‘साइन कॉस थीटा…’ म्हणत संवाद मांडणारा ओंकार प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसायला लावत असे. आता पुन्हा एकदा तोच जादूई अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. ओंकारने नुकतीच कार्यक्रमाच्या नव्या भागांच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, आणि काही दिवसांत तो पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या परतीने हास्यजत्रेच्या मंचावर हसण्याचा वर्षाव होणार, हे नक्की.

काही महिन्यांपूर्वी ओंकारने अचानक कार्यक्रमातून बाहेर पडल्याने चर्चेचा भडका उडाला होता. त्याच्या जाण्याने प्रेक्षक निराश झाले होते आणि सोशल मीडियावर “ओंकारला परत आणा” अशा मागण्या उसळल्या होत्या. अखेर चाहत्यांच्या या प्रेमाचा सन्मान राखत ओंकारने पुन्हा हास्यजत्रेत एंट्री घेतली आहे. (Onkar Bhojane Hasyajatra)
=============================
=============================
त्याच्या पुनरागमनाने कार्यक्रमातील विनोदाचा दर्जा आणखी चढेल, अशी चर्चा आधीच रंगत आहे. मंचावर ओंकार आणि त्याच्या सहकलाकारांची जुगलबंदी पुन्हा एकदा रंगणार असून, प्रेक्षकांसाठी ही खरी दिवाळी ठरणार आहे. कोकणच्या या रत्नामुळे हास्यजत्रेचं तेज आणखी वाढणार, यात शंका नाही.