Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Taath Kana Movie Trailer:  जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Suraj Chavan चं केळवण! बायकोेसाठी घेतला भारी उखाणा एकदा ऐकाचं…

Last Stop Khanda Movie Trailer: प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा हलकाफुलका, भावनिक

Aaksh Narayankar-Anjali Shinde : मरणाच्या दारातून आलेल्या महाराष्ट्रातल्या रिलकपलची रिअल

चक्क Salman Khan याला ऑफर केली होती ऐश्वर्या रायच्या भावाची

Anwar: हमसे क्या भूल हुयी जो ये सजा हमको मिली…

Gondhal Movie : इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’!

थिएटर गाजवल्यानंतर Dahshavatar आता ओटीटीवर कल्ला करायला सज्ज!

‘देसी गर्ल’ Priyanka Chopra बॉलिवूड नाही तर साऊथमधून करणार कमबॅक!

रेकॉर्डिंगच्या वेळी झालेली चूक Kishore Kumar यांनी शूटिंगच्या वेळी कशी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Onkar Bhojane ची घर वापसी; ‘या’ दिवसापासून पुन्हा दिसणार हास्यजत्रेत… 

 Onkar Bhojane ची घर वापसी; ‘या’ दिवसापासून पुन्हा दिसणार हास्यजत्रेत… 
टीव्ही वाले मिक्स मसाला

Onkar Bhojane ची घर वापसी; ‘या’ दिवसापासून पुन्हा दिसणार हास्यजत्रेत… 

by Team KalakrutiMedia 13/10/2025

‘Maharashtrachi Hasyajtra’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात लग्नमंडपात रागावणारा मामा, तर कधी ‘अगं अगं आई’ म्हणत निरागस चेहरा करणारा मुलगा या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं होतं. आणि आता पुन्हा एकदा हसण्याचा झंकार रंगणार आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कलाकाराचा म्हणजेच अभिनेता ओंकार भोजनेचा (Onkar Bhojne) भव्य पुनरागमन होतोय. ‘कोकण कोहिनूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओंकारने काही काळ कार्यक्रमाला विश्रांती दिली होती. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत चाहत्यांना त्याची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. अखेर चाहत्यांची ही आतुरतेने वाट पाहिलेली इच्छा पूर्ण होत असून, ओंकार लवकरच पुन्हा हास्यजत्रेच्या मंचावर धमाल उडवणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी ही एक भन्नाट भेट ठरणार आहे.(Onkar Bhojane Hasyajatra)

Onkar Bhojane Hasyajatra

ओंकारने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत तो नवसंजीवनी आणायचा. त्याची अभिनयशैली, संवादफेक आणि वेळ साधण्याचं अचूक कौशल्य यामुळे प्रत्येक स्किट गाजायचं. पाहुणे कलाकारसुद्धा त्याच्या प्रतिभेचं कौतुक केल्याशिवाय राहू शकत नव्हते. ‘साइन कॉस थीटा…’ म्हणत संवाद मांडणारा ओंकार प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसायला लावत असे. आता पुन्हा एकदा तोच जादूई अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. ओंकारने नुकतीच कार्यक्रमाच्या नव्या भागांच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, आणि काही दिवसांत तो पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या परतीने हास्यजत्रेच्या मंचावर हसण्याचा वर्षाव होणार, हे नक्की.

Onkar Bhojane Hasyajatra

काही महिन्यांपूर्वी ओंकारने अचानक कार्यक्रमातून बाहेर पडल्याने चर्चेचा भडका उडाला होता. त्याच्या जाण्याने प्रेक्षक निराश झाले होते आणि सोशल मीडियावर “ओंकारला परत आणा” अशा मागण्या उसळल्या होत्या. अखेर चाहत्यांच्या या प्रेमाचा सन्मान राखत ओंकारने पुन्हा हास्यजत्रेत एंट्री घेतली आहे. (Onkar Bhojane Hasyajatra)

=============================

हे देखील वाचा: Lakhat Ek Amcha Dada मालिका संपल्यानंतर अभिनेता नितीश चव्हाणची भावुक पोस्ट, म्हणाला ‘मला सख्खी बहिण नाही पण…’

=============================

त्याच्या पुनरागमनाने कार्यक्रमातील विनोदाचा दर्जा आणखी चढेल, अशी चर्चा आधीच रंगत आहे. मंचावर ओंकार आणि त्याच्या सहकलाकारांची जुगलबंदी पुन्हा एकदा रंगणार असून, प्रेक्षकांसाठी ही खरी दिवाळी ठरणार आहे. कोकणच्या या रत्नामुळे हास्यजत्रेचं तेज आणखी वाढणार, यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment maharashtrachi hasyajatra marathi Comedy show onkar bhojane onkar bhojane comeback Sony marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.