
Oscar Awards 2025 : यंदाही भारताचा ऑस्कर हुकला, पाहा विजेत्यांची यादी
चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ९७ वा अॅकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. २०२५ ला जागतिक चित्रपटांच्या सोबतीने भारतीय चित्रपटांचीही चुरशीची लढत होती. मात्र, यंदाही भारताला ऑस्कर मिळाला नसल्यामुळे भारतीयांची निराशा झाला आहे. मात्र, ऑस्कर २०२५ वर आपली नावं कोरण्यात कोण यशस्वी झाले आहेत त्या विजेत्यांची नावं आणि यादी जाणून घेऊयात… (Oscar Awards 2025)
ऑस्कर २०२५ विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट
अनोरा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मिकी मॅडिसन
सर्वोत्कृष्ट अभिनेता
अॅड्रियन ब्रॉडी (द ब्रुटलिस्टसाठी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सीन बेकर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
झो साल्दा (एमिलिया पेरेझसाठी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
कियरन कल्किन
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
लोल क्रॉली (द ब्रुटलिस्टसाठी)
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म
आय एम नॉट अ रोबोट
सर्वोत्कृष्ट व्हिजूअल इफेक्ट्स
ड्यून २
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म
नो अदर लॅ
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म
द गर्ल इन द ऑक्रेस्ट्रा

सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग
‘El Mal’
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग
सीन बेकर (अनोरा)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंग
द सबस्टेन्स
सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रिनप्ले
पीटर स्ट्रगन (कॉनक्लेव्हसाठी)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले
सीन बेकर (अनोरसाठी)
==================
हे देखील वाचा :Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा
==================
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म
इन द शॅडो ऑफ द सायप्रस
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म
फ्लो

ऑस्कर २०२५ साठी भारताकडून प्रियांका चोप्राची सह-निर्मिती असणाऱ्या अनुजा या शॉर्ट फिल्मला नॉमिनेशन मिळालं होतं. मात्र, यंदाही ऑस्करकडून भारताच्या पदरी निराशाच पडली आहे. अनुजा या शॉर्ट फिल्मची कथा दोन बहिणींभोवती फिरणारी असून पैसे कमवण्यासाठी त्यांचं अपार कष्ट आणि सोबतच शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड यात दाखवली आहे. (Oscar Awards) 2025)