Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

ऑस्करवारी केलेले भारतीय सिनेमे!
ऑस्कर, चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार! जगातील प्रत्येक सिनेकलाकारांचं इथे जाण्याच हमखास स्वप्न असतं. कित्येक लोकांचं ते स्वप्न हे स्वप्नचं राहून जात. ऑस्करच्या सोहळ्यात एखादी कलाकृती दाखवता येणे, ती तिथे दाखवली जाणे हा त्या कलाकृतीशी संलग्न कलाकरांचाचं सन्मान नसतो तर त्यांच्या देशासाठी देखील गौरवाची गोष्ट असते. सुरुवातीला अमेरिका आणि हॉलीवूड पुरत्या मर्यादित असलेल्या या सोहळ्याला आता जागतिक स्वरूप प्राप्त झाले. जगभरातील देशांमध्ये जणू इथे येऊन उत्कृष्ट कलाकृती दाखवण्याची स्पर्धाच लागलेली असते. भारतीय चित्रपटांनी (Indian cinema) देखील वेळोवेळी ऑस्करच्या रेड कार्पेटवर देशाची मान वेळोवेळी उंचावली आहे. भारतातून दरवर्षी एक अधिकृत चित्रपट पाठवला जातो. पण बऱ्याचदा हे चित्रपट प्राथमिक फेरीमधूनच बाहेर होतात. पण कित्येक चित्रपट, लघुपट आणि डॉकुमेंटरीजनी ऑस्करला गवसणी घालण्याचा पराक्रम देखील केला आहे. ऑस्कर सोहळ्यात भारताची मान उंचवणाऱ्या चित्रपटांविषयी (Indian cinema) थोडक्यात जाणून घेऊया.

मदर इंडिया
मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला होता. नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार आणि राजकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळचा खूप महागडा चित्रपट होता आणि कमाईच्या बाबतीत देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भारताकडून हा चित्रपट प्रतिष्ठित ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला. ऑस्करमध्ये नामांकन मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट (Indian cinema) ठरला होता.
The house that Ananda built
१९६८ साली आलेली ही शॉर्ट डॉकुमेंटरी फिल्म फाली बिलीमोरिया यांनी दिग्दर्शित केली होती. हा चित्रपट आनंदा या नागपुरातील यशस्वी व्यावसायिकाच्या जीवनावर प्रकाश टाकते. त्याचं एकंदरीत कौटुंबिक जीवन, त्याची मुले इत्यादी गोष्टींचा मागोवा घेत ही फिल्म आपल्यासमोर आनंदाचं जीवन उलगडते. या डॉकुमेंटरीला ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते.(Indian cinema)
An encounter with faces
१९७८ साली आलेल्या या डॉकुमेंटरीचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केलेलं आहे. के के कपिल यांनी या डॉकुमेंटरीची निर्मिती केलेली आहे. एका अनाथाश्रमातील मुलांच्या आयुष्यावर ही डॉकुमेंटरी प्रकाश टाकते. १९७९ सालीच्या ऑस्कर सोहळ्यात या डॉकुमेंटरीला नामांकित करण्यात आले होते.(Indian cinema)
सलाम बॉम्बे
मीरा नायर दिग्दर्शित सलाम बॉम्बे हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला. मीरा नायरच्या या पहिल्यावहिल्या फिल्ममध्ये शफिक सय्यद, रघुवीर यादव, अनिता कंवर, नाना पाटेकर, इरफान खान आदी कलाकरांनी अभिनय केला आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर हा चित्रपट भाष्य करतो. बेस्ट इंटरनशनल फिचर साठी या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. याव्यतिरिक्त या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा एक आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या “द बेस्ट १००० मूव्हीज एव्हर मेड”च्या यादीमध्ये हा चित्रपट गणला जातो. (Indian cinema)
लगान
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित, अमीर खान प्रोडक्शन द्वारा निर्मित हा चित्रपट भारतीय सिनेमा इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत या चित्रपटाने भरमसाठ गल्ला जमवला होता. अमीर खान आणि इतर कलाकरांची फार मोठी फळी यामध्ये दिसून येते. २००३ च्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला नामांकन मिळाले होते.

Little terrorist
या चित्रपटाचे कथानक जमाल नावाच्या एका १० वर्षीय पाकिस्तानी मुलाच्या भोवती फिरते जो क्रिकेट खेळतांना चुकून सिमा ओलांडून भारतात येतो आणि अडचणीत सापडतो. त्याच्या परत पाकिस्तानात जाण्याच्या प्रवासावर हा चित्रपट भाष्य करतो. अश्विन कुमार यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. शॉर्ट फिल्म विभागात या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाले होते. (Indian cinema)
Writing with fire
रायटिंग विथ फायर हा 2021 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेली डॉक्युमेंटरी आहे. सुष्मित घोष आणि रिंटू थॉमस यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. दलित महिलांचा डिजीटल पत्रकारितेतील प्रवास यात चित्रित करण्यात आला आहे. बेस्ट डॉकुमेंटरी फिचर विभगात अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला ही पहिली भारतीय फीचर डॉक्युमेंटरी आहे. (Indian cinema)
All that breathes
ही २०२२ चा शौनक सेन दिग्दर्शित डॉक्युमेंटरी फिल्म आहे. शौनक सेन, अमन मान आणि टेडी लीफर यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट मोहम्मद सौद आणि नदीम शेहजाद या भावंडांना फॉलो करतो, जे भारतात जखमी पक्ष्यांना वाचवतात आणि त्यांच्यावर उपचार करतात.
22 जानेवारी 2022 रोजी सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला, जिथे वर्ल्ड सिनेमा डॉक्युमेंटरी कॉम्पीटीशनमध्ये याला ग्रँड ज्युरी पारितोषिक मिळाले. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग सेक्शनमध्ये याचे स्क्रीनिंग देखील होते, जिथे त्याने गोल्डन आय जिंकला. नंतर बेस्ट डॉकुमेंटरी फिचरफिल्मसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले.
The Elephant whisper
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन कार्तिकी गोंसाल्वेस यांनी केले आहे. रघु, एक अनाथ हत्तीचा मुलगा आणि एका जोडप्यामधील प्रेमळ नातेसंबंध ही डॉक्युमेंटरी उलगडते. या डॉक्युमेंटरीला ऑस्करमध्ये फक्त नामांकनच मिळाले नाही तर या डॉक्युमेंटरीने ऑस्कर पुरस्कारदेखील पटकावला. ऑस्कर पुरस्कार पटकावणारा भारतीय निर्मिती असलेला हा पहिला माहितीपट ठरला. (Indian cinema)
======
हे देखील वाचा : फायटिंगलाही ॲक्टींग लागते यावर शिक्कामोर्तब!
======
RRR
एस एस राजमौली यांनी दिग्दर्शित केलेला आणि एनटीआर, रामचरण यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट संपूर्ण जगाने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. यातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन भारतीय स्वतंत्र योद्ध्यांची काल्पनिक गोष्ट या चित्रपटाद्वारे मांडण्यात आलेली आहे.