
OTT Release July :Special Ops 2 ते ‘आप जैसा कोई’; या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या कलाकृती!
थिएटरमध्ये जाऊन महागातले पॉपकॉर्न्स खात चित्रपट पाहण्यापेक्षा अलीकडे लोकं घरात होम थिएटर करुन चित्रपट किंवा सीरीज पाहणं अधिक पसंत करतात… थिएटर्समध्ये चित्रपट पाहायला जातातच त्यात वाद नाही पण तरी घरी निवांत चित्रपट किंवा सीरीज पाहण्याची मजा काही वेगळीच असते.. (Entertainment News)
हॉरर, क्राइम, थ्रिलर, ड्रामा, फॅमिली शो अशा विविध कलाकृती ओटीटीवर पाहता येतात. ओटीटीवर प्रामुख्याने क्राईम, थ्रिलर, हॉरर या विषयांवर आधारित चित्रपट, वेब सीरिज आधिक पाहिल्या जातात.. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘हेड्स ऑफ स्टेट’, ‘ठग लाइफ’, ‘कालीधर लापता’ (Kaalidhar Lapata), ‘गुड वाइफ’ असे काही चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या होत्या. आता या आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर काय पाहायला मिळणार जाणून घेऊयात…(Ott Release)
स्पेशल ऑप्स २ :
जिओ हॉटस्टारवर गाजलेल्या ‘स्पेशल ओप्स’ (Special Ops 2) या वेब सीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… ११ जुलैपासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हिम्मत सिंग भेटणार असून त्याचं पुढचं मिशन काय असेल याकडे सगळ्यांच लक्ष लागालं आहे… शिवाय यावेळी त्याला अभिनेता जयदीप अहलावत भिडणार असून आणखीच उत्सुकता वाढली आहे…

मूनवॉक
‘मूनवॉक’ हा एक मल्याळम चित्रपट असून ८ जूलै २०२५ रोजी हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर रिलीज झाला आहे… केरलामधील यंगस्टर्स डान्सर ग्रुपची सत्यघटनेवर आधारित कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.क. विनोद यांनी केलं आहे…

आप जैसा कोई
आर माधवन आणि फातिमा शेख यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘आप जैसा कोई’ (Aap Jaisa Koi) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ११ जुलै २०२५ रोजी रिलीज होणार आहे… विवेक सोनी यांचं दिग्दर्शन असलेल्या या रोमँटिक चित्रपटाची कथा शिक्षक जोडप्याची भोवती फिरते…यात आर माधवन संस्कृत शिक्षक तर फातिमा शेख फ्रेंच शिक्षक दाखवले आहेत…

बॅलार्ड
बॅलार्ड (Ballard) ही एक हॉलिवूड डिटेक्टिव्ह सीरीज असून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर ९ जुलै २०२५ पासून जगभरात रिलीज होणार आहे. सीरीजचं कथानक एलएपीडी (LAPD) डिटेक्टिव्ह रेनी बॅलार्डभोवती फिरत असून मॅगी क्यू हिने प्रमुख भूमिका साकारली आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi