
OTT movie and web series release 2025 : ‘छावा’ ते ‘छोरी’ जाणून घ्या या वीकेंडची यादी!
जानेवारी ते एप्रिल २०२५ पर्यंत थिएटरमध्ये एकाहून एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले… काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस (Box office collections) गाजवला तर काही चित्रपट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवण्यात अपयशी ठरले.. ७ ते १३ एप्रिल २०२५ दरम्यान थिएटर गाजवणारे काही चित्रपट आणि नव्याने रिलीज होणाऱ्या कलाकृती कोणत्या आहेत त्यांची यादी जाणून घ्या…विशेष म्हणजे सलमान खानच्या ‘सिकंदर’लाही (Sikandar) पाणी पाजणाऱ्या विकी कौशलच्या (Vicky Kaushal) ‘छावा’ चित्रपटाचाही यात समावेश आहे..(Ott release this week)
छावा
छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. ५१ दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी कौशलचा हा पहिला ऐतिहासिक चित्रपट आता घरबसल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या वर्षीचा ५०० कोटी पार करणारा पहिला चित्रपट ‘छावा’ ओटीटीवर ११ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे…(Chhaava ott release)

द लेजेंड ऑफ हनुमान
‘द लेजेंड ऑफ हनुमान’ (The Legend Of Hanuman Season 6) या ॲनिमेटेड सीरिजच्या ५ यशस्वी भागानंतर आता सहावा सीझन रिलीज सज्ज झाला आहे.. हा नवीन सीझन ११ एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे..(Bollywood dhamaka)

छोरी 2 (Chhorii 2)
नुसरत भरुचा हिला २०११ साली रिलीज झालेल्या ‘छोरी’ चित्रपटाचा सिक्वेल ‘छोरी 2’ (Chhorii 2) OTT वर रिलीज ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. या थ्रिलक-हॉरर चित्रपटात नुसरत भरुचा आणि सोहा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
===============================
हे देखील वाचा : Chhorii 2 : थरकाप उडवणारा नुसरतच्या छोरी २ चा टीझर रिलीज
================================
हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.. विशाल फुरिया दिग्दर्शित या चित्रपटात गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन असे कलाकार दिसणार आहेत…(ott release 2025)

ब्लॅक मिरर सीझन 7
‘ब्लॅक मिरर’चे (Black Mirror) आधीचे सर्व सीझन प्रेक्षकांना खूप आवडले. आता निर्माते त्याचा सातवा सीझन घेऊन आले आहेत. ‘ब्लॅक मिरर सीझन 7’ ही एक सायन्स फिक्शन सीरिज असून १० एप्रिल २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (Entertainment)
