Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना… निवांतपणे कुटुंबासोबत घरी बसून सीरीज किंवा चित्रपट पाहण्यात एक वेगळीच मज्जा असते…. तर या आठवड्यात म्हणजे १२ ते १८ मे च्या दरम्यान ओटीटीवर कोणते चित्रपट किंवा वेब सीरीज तुम्ही पाहू शकता याची यादी नक्की वाचा….(Entertainment)
डस्टर
अलीकडे लोकांना क्राइम ड्रामा किंवा क्राइम सस्पेन्स असे चित्रपट किंवा सीरीज पाहायला खुप आवडतात… तर याच पठडीतील डस्टर’ ही एक वेब सीरिज अअसून यात ७० च्या दशकातील क्राइम ड्रामा पाहायला मिळणार. प्रेक्षकांना FBI ची पहिली कृष्णवर्णीय महिला एजंट (रेचेल हिल्सन) आणि एक प्रतिभावान गेटअवे ड्रायव्हर (जोश हॉलोवे) यांची कथा या सीरीजमध्ये पाहायला मिळणार असून १६ मे रोजी जिओ हॉटस्टारवर सीरीज रिलीज झाली आहे.(Bollywood masala)

है जुनून
गेल्या अनेक दिवसांपासून जॅकलिन फर्नांडिस व नील नितीन मुकेश यांच्या म्युझिकल ड्रामा सीरिजची चाहते वाट पाहत आहेत. अखेर ही सीरीज जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. या सीरिजची कथा एका महाविद्यालयाभोवती फिरते जिथे दोन विद्यार्थ्यांचे क्लब आहेत. या क्लबचे नेतृत्व पर्ल आणि गगन करत असतात. दोघांमध्ये रंगलेल्या या क्लबमधील स्पर्धेत कोण जिंकत हे पाहण्यासाठी सीरीज नक्की पाहा…(Bollywood tadaka)

मरनामस
हिंदी, मराठीसोबत दाक्षिणात्य कंनेन्ट पाहण्यातही प्रेक्षकांना विशेष रस आहे. त्यातच कॉमेडी कलाकृती असेल तर उत्तमच. तर असा ‘मरनामस’ हा एक मल्याळम चित्रपट रिलीज झाला असून यात भरपूर कॉमेडी व थरार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात बेसिल जोसेफ मुख्य भूमिकेत असून तो ओएलएक्सवर एका स्थानिक पोलीस स्टेशनची माहिती टाकतो आणि यानंतर यात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स कसे येतात हे दाखवलं आहे. प्रेक्षकांना चित्रपट सोनी लिव्हवर पाहता येईल. (Tollywood movies)
