पांच : फिल्म रिलीज झाली नाही तरी लाखो लोकांनी पाहिली !
अनुराग कश्यप हा बॉलिवूडमधील एक महत्वाचा दिग्दर्शक! आपल्या वास्तववादी आणि मॉडर्न स्टाईलच्या चित्रपटांमुळे त्याने आपला एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे आणि तो दरवेळी वाढतच चालला आहे. ब्लॅक फ्रायडे, अग्ली, गँग्स ऑफ वासेपूर, नो स्मोकिंग, रमण राघव अशा दर्जेदार चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन करून त्यांनी बॉलिवूड चित्रपटांना नवा आयाम दिला. पण त्यांनी त्यांच्या करियर सर्वात आधी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. त्याचे नाव होते ‘पांच’ ! (Film Release)
पुण्यात घडलेल्या ‘जोशी-अभ्यंकर खून खटल्यावरती ‘पांच’ हा चित्रपट आधारलेला होता. यात ल्युक मॉरिसन, पॉंडी, जॉय, मार्गी अशा चार दोस्तांच्या आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या शिवुली या मुलीच्या भोवती याचे कथानक फिरते. हे पाचही लोकांचा जीवनात एकाच उद्देश असतो तो म्हणजे मजामस्ती, नशापाणी करणे. पॉंडीला शिवुली आवडत असते. शिवुलीला पैसे कमवण्यासाठी श्रीमंत लोकांसोबत वेळ घालवण्याबद्दल काहीच हरकत नसते. या ग्रुपचा स्वयंघोषित लीडर असतो जो या सर्व कफल्लक लोकांना राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि नशेसाठी पुरवत असतो. हे सर्व या गरिबीला कंटाळून एकदाच मोठा हात मारण्यासाठी हे सर्व या गरिबीला कंटाळून एकदाच मोठा हात मारण्यासाठी निखिल नावाच्या मित्राला किडनॅप करण्याचा प्लॅन बनवतात. ज्यात निखिल स्वतः सामील होतो. त्याला किडनॅप केल्यानंतर ल्युक ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यानंतर रागात निखिलचा खून करतो. या सर्वांमध्ये शिवुलीसुद्धा इन्व्हॉल्व्ह होते. तिकडे ल्युक सगळ्यांना घाबरावतो आणि धमकी देतो जेणेकरून कोणी पोलिसात जाणार नाही. पुढे ते निखिलच्या वडिलांचा आणि या किडनॅपिंगचा तपास करणाऱ्या अधिकारीच देखील खून करतात. अशा प्रकारे या सिनेमाचा प्लॉट अजूनच गुंतागुंतीचा होत जातो. ज्यात एकमेकांना धोके देणे अजूनच रंग भरते. (Film Release)
या सिनेमाच्या कथेची कल्पना अनुराग कश्यप यांना १९९३ साली सेंट झेवियर्सच्या हॉस्टेल यामध्ये राहत असताना आली. तिथे एक म्युझिक बँड राहायचा आणि ते कसे राहतात यावर त्यांनी नोट्स काढल्या होत्या आणि त्यावरती आधारित एक ‘मिराज’ नावाची कथा लिहायला घेतली. ती कथा अर्धी झाली असताना वीजे ल्युक केनी यांना या सिनेमाबद्दल भेटले पण त्याचे पुढे काही झाले नाही, दरम्यान जोशी अभ्यंकर खटल्याबद्दल अनुरागच्या वाचनात आले आणि त्याने त्या तरुणांची कथा सिनेमासाठी योग्य वाटली आणि त्यांना ‘मिराज’ पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली.(Film Release)
या सिनेमात ल्यूकच्या भूमिकेत काम केले आहे के के मेनन यांनी .. त्यावेळी केके पृथ्वी थियेटरमधील नाटकांमध्ये काम करायचे. त्यांनी ऍडव्हर्टीझिंग क्षेत्रातील नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ही फिल्म बनून झाल्यानंतर इंडस्ट्री मधील लोकांना दाखवण्यात आली होती. तेव्हा विधू विनोद चोप्रा यांनी केके च्या कामाची तुलना रॉबर्ट डिनेरो या महान अमेरिकन अभिनेत्याशी केली होती. अशा प्रकारचे कौतुक केके यांच्यासाठी फारच उमेद वाढवणारे होते. केके यांना त्यावेळी वाटले होते की आता इंडस्ट्री आपली खरी दखल घेईल. पण नियतीच्या मनात वेगळे होते.(Film Release)
सेन्सर बोर्डच्या सदस्यांना त्यातील काही सीन्समध्ये वापरलेली भाषा अतिशय बोल्ड, ड्रग्सचा आणि हिंसेचा अतिरेक वाटला म्हणून त्यांनी काही सीन्सना कात्री लावून मग रिलीज करण्याची परवानगी दिली. ही फिल्म हॅम्बर्ग फिल्म फेस्टिवल, लॉस अँजेलास इंडियन फिल्म फेस्टिवल अशा अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये निवडण्यात आली होती आणि तिकडे तिचे कौतुक देखील झाले होते. पण निर्मात्याला पैशांची अडचण आली आणि त्यांना ही फिल्म रिलीज करता आली नाही.(Film Release)
============
हे देखील वाचा : ‘दाग’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी ‘हा’ अभिनेता होता ‘क्लॅपर बॉय’!
===========
पुढे अनुराग कश्यप यांनी ब्लॅक फ्रायडे बनवली आणि ती सुद्धा सेन्सर बोर्डामुळे रिलीज होऊ शकली नाही. आपल्या करियरच्या सुरुवातीलाच एवढे प्रॉब्लेम आल्यामुळे कश्यप खूपच निराश झाले होते. दोन्ही फिल्म्स रिलीज करण्यासाठी त्यांचे खूप दिवस प्रयत्न चालू होते पण काही यश नव्हते आणि मग त्यांनी पांचची कॉपी टोरेंटवरती लीक केली आणि अशा तऱ्हेने ही फिल्म प्रेक्षकांना बघायला मिळली. माऊथ पब्लिसिटीद्वारे अनेकांना या फिल्मबद्दल समजले आणि त्यांनी ती फिल्म बघितली. पुढे ब्लॅक फ्रायडे आणि बाकीच्या फिल्म रिलीज झाल्या. त्या क्रिटिक्स आणि प्रेक्षक या दोघांच्या पसंतीस उतरल्या मग अजून प्रेक्षकांनी त्यांच्या सर्व फिल्म्स पहिल्या अशा प्रकारे पांच रिलीज न होऊन सुद्धा लाखो प्रेक्षकांनी पाहिली !