Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Paaru Serial: अखेर पारु आणि आदित्य लग्नबंधनात अडकणार; मालिकेट येणार मोठा ट्विस्ट !
Zee Marathi वरील ‘पारू‘ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. मालिकेतील नाट्यमय वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंतीचे संबंध हे कथानक अधिकच उत्कंठावर्धक बनवत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात मालिकेने एक भावनिक आणि धक्कादायक ट्विस्ट घेतला आहे, ज्यामुळे प्रेक्षकही अवाक झाले आहेत. या वळणात पारू आणि आदित्य यांच्या नात्यात एक नव वळण आला आहे. पारूवर झालेल्या अन्यायामुळे ती खूप भावनिकरीत्या तुटलेली आहे.(Paaru Marathi Serial)

तिचं मनोधैर्य संपत चाललेलं असतानाच, आदित्य तिच्या मदतीला पुढे येतो. तो केवळ तिच्या दुःखात सहभागी होत नाही, तर तिचं संरक्षण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतो जो आहे पारूशी लग्न करण्याचा! या निर्णयामागे कुठलाही प्रेमभाव नाही, तर आदित्यला पारूवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालायचा आहे. तिचं आयुष्य पुन्हा स्थिर आणि सन्मानाने जगता यावं, यासाठी तो तिच्याशी लग्न करण्याचं ठरवतो.

आदित्यचा हा निर्णय कुणालाही अपेक्षित नव्हता. ना पारूला, ना तिच्या कुटुंबाला, ना प्रेक्षकांना. मालिकेत या घटनांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आदित्यच्या कुटुंबातही या निर्णयावरून मतभेद होऊ लागले आहेत. काहींना वाटतं की तो चुकीचं पाऊल उचलतो आहे, तर काहीजण त्याच्या संवेदनशीलतेला आणि धाडसाला सलाम करत आहेत.(Paaru Marathi Serial)
==============================
हे देखील वाचा: ‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !
==============================
प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर या वळणामुळे मालिकेची रंगत अधिकच वाढली आहे. आदित्य-पारूचं नातं आता कोणत्या दिशेने जाईल? त्यांच्या लग्नाचं पुढं काय होईल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘पारू‘ ही मालिका सुरुवातीपासूनच आपल्या सामाजिक संदेशांसाठी ओळखली जाते. या नव्या ट्रॅकमध्येही स्त्रीला साथ देणारा पुरुष, तिच्या आत्मसन्मानासाठी उभा राहणारा मित्र किंवा सहचर दाखवला जातो. हे एक सकारात्मक चित्र निर्माण करतं. आता पुढील भागांमध्ये ही कथा कोणत्या दिशेने वळते, आदित्यचं निर्णय पारूच्या आयुष्यात प्रकाश आणतो की आणखी संघर्ष, हे पाहणं रंजक असणार आहे.