‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पाकिस्तानी मुलगी सबाच्या आयुष्याची रंजक गोष्ट… एक सत्यघटना!!!
स्त्री ने आपलं शरीर कोणाला द्यायचं हे तिचे बाप, भाऊ, चुलते ठरवतात. मग मुलगा जाती/धर्मातला असला नसला तरी काही फरक पडत नाही. मुळात आपली मुलगी प्रेमातच कशी पडू शकते? आमची सहमती नसलेल्या “गैर” मुलासोबत ही लग्नच कशी करू शकते हा विचारच त्यांना सहन होत नाही.
“A girl in the River” ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी फिल्म. याची डिरेक्टर Sharmeen obaid-chunoy ही स्त्री असल्या कारणाने यात फिमेल गेझ चांगला उतरलाय.
सबा नावाची पाकिस्तानी मुलगी आई वडिलांच्या विरोधात जाऊन आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न करते. तिने लग्न केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा बाप आणि चुलता हे तिला आणायला जातात. घरी चल म्हणतात. अर्थात तिला जायचं नसतं. पण ते गोड बोलतात, “कुराण” वर हात ठेऊन तुला कोणती इजा करणार नाही सांगतात. फक्त आता घरी चल, आम्ही तुला सन्मानाने परत आणून सोडू म्हणतात.
कुराण च्या शपथेमुळे विश्वास ठेवून ती सोबत येते.
बाप आणि चुलता मधल्या रस्त्यात आलं की गाडी थांबवतात. तिला मारहाण करतात, गोळी मारतात जी तिला घासून जाते. जखमी झालेल्या सबा ला बॅग मध्ये भरतात आणि नदीत फेकून निघून जातात. त्यांना वाटतं आता ही तळाला जाऊन मरून जाईल आणि कोणाला कळणार पण नाही.
पण शुद्धीत आलेली सबा तिथून बाहेर पडून जवळच्या पेट्रोल पंपावर जाते. आणि तिथल्या व्यक्तीच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते.
“ऑनर किलिंग सर्व्हायवर!” एखाद्या काल्पनिक चित्रपटात घडावी अशी ही सत्यघटना. अर्धी डॉक्युमेंटरी ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतानाची आहे. एवढं झाल्यानंतर सुद्धा तिचे आई-बाप आणि घरच्यांचा ऍरोगन्स काडीचा कमी होत नाही.
कुराण वर हात ठेवून देखील हा बाप पोटच्या पोरीला मारायला मागे पुढे पाहत नाही. म्हणजे “ऑनर” समोर बाकी सगळं फिकं आहे!
सबा तर ब्रेव्ह आहेच, तिच्या हिम्मतीला सलाम. तिच्या इतकंच हिम्मतीचं आणि कौतुकाचं काम डिरेक्टर Sharmeen obaid-chunoy यांनी केलंय.
ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर, ऑनर किलिंग कायद्यात बदल करू असं पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले होते.
म्हणून सिनेमा जगतात याला “सोसायटी चेंजिंग” सिनेमा म्हणतात.
ह्या डॉक्युमेंटरीचा अकॅडमी ने ऑस्कर देऊन सन्मान केलाच आहे.
समजेल अशी हिंदी असल्याने हा सिनेमा आपल्याला अजून टच होतो. युट्युब ला आहे अवघ्या 38 मिनिटांचा. नक्की बघा. असे सिनेमे सेलिब्रेट झाले पाहिजेत, सिनेमा साठी ते चांगलय.
-निलेश खंडाळे