‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
श्वेता तिवारीच्या दुसऱ्या गरोदरपणाची बातमी ऐकून पलकला बसला होता धक्का
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पलक तिवारीची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक होत असून पहिल्या चित्रपटात सलमान खान बरोबर झळकणे ही काही छोटी गोष्ट नाही. आता पलक एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान पलक ने केवळ आपल्या करिअरबद्दलच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले.एका मुलाखतीत तिने सांगितले की, जेव्हा ती 15 वर्षांची होती तेव्हा तिची आई दुसऱ्यांदा गरोदर राहिली आणि यामुळे तिला बराच काळ त्रास झाला. मात्र नंतर तिच्या आयुष्यात एक क्षण असा आला की ती त्या मुलासाठी काहीही करायला तयार होती.(Shweta Tiwari pregnancy)
अलीकडेच पलकने आईच्या दुसऱ्या गरोदरपणाची बातमी कळताच तिची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले. ती म्हणाली “मला आठवते की मी १५ वर्षांचा होतो आणि ही बातमी ऐकल्यानंतर खूप अस्वस्थ झाले होतो जेव्हा माझ्या आईने मला सांगितले की तिला पुन्हा बाळ होणार आहे. माझी प्रतिक्रिया अशी होती की नाही हे असं नाही होऊ शकत. आईला माझी प्रतिक्रिया काहीशी विचित्र वाटली.” पलक पुढे म्हणाली की, ‘मी असे बोलत होते की जणू माझ्यात आणि माझ्या आईमध्ये करार झाला आहे आणि त्यांनी त्या करारात माझी फसवणूक केली आहे. जेव्हा मी आईला म्हणाले की ‘हे असं होऊ शकत नाही. तेव्हा आई म्हणाली काय होऊ शकत नाही? ही अशी काय बोलत आहे, अशा नजरेने आई माझ्याकडे बघत होती.
पलक पुढे अस ही म्हणाली की, ‘माझ्यासाठी टर्निंग पॉईंट तो होता म्हणजे जेव्हा मी माझ्या आईसोबत सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, जेव्हा मी पहिल्यांदा बाळाचा फोटो पाहिला, तेव्हा मला रडू लागले. मी थरथरतही होतो, त्यावेळी मला वाटले की या मुलापेक्षा माझं या जगात कुणावरही प्रेम नाही.(Shweta Tiwari pregnancy)
==================================
हे देखील वाचा: Ankita Lokhande झाली बेरोजगार? स्वतः सांगितलं काम न मिळण्याचे कारण…
==================================
श्वेता तिवारीने पहिले लग्न राजा चौधरीशी केले होते त्यानंतर ती पलकची आई बनली. पण त्यांच हे नातं तुटलं. नंतर बऱ्याच वर्षांनंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले आणि ती पुन्हा एका मुलाची आई झाली. पलक तेव्हा त्यासाठी तयार नव्हती तरी, आज ती आपल्या भावावर खूप प्रेम करते. श्वेता तिवारीचा मुलगा रेयांश चा जन्म 27 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. रेयांशचे वडील अभिनव कोहली आणि श्वेता आता वेगळे राहतात. श्वेता आपल्या दोन मुलांचे संगोपन एकटीच करते. श्वेता आणि अभिनवने 2013 मध्ये लग्न केले होते.