Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची भूमिका साकारणार?
२५ वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत क्लासिक विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं. बाबू भैय्या, श्याम आणि राजू यांनी ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) करुन रसिक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’च्या यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असं सांगण्यात आलं. मात्र, बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Parresh Rawal) यांनी ‘हेरा फेरी ३’ मधून एक्झिट घेतल्याचं समोर आलं आहे. आता हेरा फेरी ३ मध्ये बाबू भैय्या कोण असणार या चर्चा सुरु असताना पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.(Entertainment)

मिळालेल्या माहितीनुसार,’हेरा फेरी ३’ मध्ये बाबू भैय्याच्या भूमिकेसाठी परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठींचं नाव पुढे आलं आहे. आता यावर स्वत: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकज म्हणाले की, “लोकांनी बाबूभैय्याच्या जागी माझ्या नावाचा विचार केला, हे मी सुद्धा ऐकलंय आणि वाचलंय. परंतु माझा विश्वास यावर नाही. परेश रावलजी खूप कमाल अभिनेते आहे. मी त्यांचा खूप मान ठेवतो. परंतु या भूमिकेसाठी मी योग्य व्यक्ती नाही, असं मला वाटतं.” (Bollywood news)

दरम्यान, यापूर्वी देखील ‘ओह माय गॉड २’ (OMG 2) मध्येही परेश रावल यांची जागा पंकज त्रिपाठी यांनी घेतली होती. मुळात अक्षय कुमार (Akshay Kumar) यांची प्रमुख भूमिका असणाऱा ओह माय ग़ २ चित्रपटही परेश रावल यांनी नाकारला होता. आता पुन्हा एकदा परेश यांनी हेरा फेरी ३ मधून काढता पाय घेतल्यानंतर पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा त्यांची जागा घेणार अशी चर्चा रंगली होती. (Bollywood tadaka)
================================
हे देखील वाचा: Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू भैय्यांनी दिलं स्पष्टीकरण
=================================
तसेच, परेश रावल यांनी मुलाखतीमध्ये ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचा मी भाग नसल्याचं म्हचलं होतं. त्यांनी ट्वीट करत लिहिलं होतं की , “मला इथे स्पष्ट करायचं आहे की ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे घेण्यात आलेला नाही. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम, आदर आणि विश्वासाची भावना आहे.” महत्वाचं म्हणजे अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसने परेश रावल यांना २५ कोटींची नोटीस पाठवली आहे. त्यामुले पंकज त्रिपाठींनी देखील नकार दिल्यानंतर आता बाबू भैय्या कोण साकारणार आणि मुळात या गोंधळात ‘हेरा फेरी ३’ येणार का? हा प्रश्न देखील उभा राहिला आहे. (Hera Pheri 3)